Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्या 1.66 कोटींच्याही पुढे; अमेरिका पहिल्या, ब्राजील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या क्रमांकावर
अमेरिकेत कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4,349,324 आहे. तर मृत्यूची संख्या 149,235 इतक आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राजीलमध्ये 2,483,191 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर 88,539 जणांचा मृत्यू झाला आहे.
अखंड मानवजातीसमोर उभ्या ठाकलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटावर मात करण्यसाठी किंवा त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मानवाला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे जगभरातील विविध देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या अद्यापही चढत्या क्रमावरच आहे. जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्या आता 1.66 पेक्षाही पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ (Johns Hopkins University) जगभरातील कोरोना व्हायरस (COVID 19) संक्रमितांची एकूण संख्या प्रकाशित करते.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचा सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (सीएसएसई) हा विभाग ही आकडेवारी जाहीर करतो. या विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत जगभरात एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 16,667,130 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 659,045 इतका आहे.
सीएसएसईने म्हटले आहे की, जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4,349,324 आहे. तर मृत्यूची संख्या 149,235 इतक आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राजील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राजीलमध्ये 2,483,191 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर 88,539 जणांचा मृत्यू झाला आहे. ( हेही वाचा, कोरोना व्हायरस महामारी ही WHO ने घोषित केलेली आतापर्यंतची 'सर्वात गंभीर' आपत्कालीन परिस्थिती; जगात गेल्या 4 दिवसांत 10 लाख रुग्णांची नोंद, एकूण संख्या 1.6 कोटींच्या वर)
कोरोना व्हायरस संक्रमनात अव्वल असणारे देश (आकडेवारी)
- अमेरिका- 4,349,324
- ब्राजिल- 2,483,19
- भारत -1,483,156
- रशिया- 822,060
- दक्षिण अफ्रीका- 459,761
- मेक्सिको- 402,697
- पेरू- 389,717
- चिली- 349,800
- इंग्लंड- 302,293
- ईरान- 296,273
- स्पेन- 280,610
- पाकिस्तान- 275,225
- सऊदी अरब- 270,831
- कोलंबिया- 257,101
- इटली- 246,488
- बांग्लादेश- 229,185
- तुर्की- 227,982
- फ्रांस- 221,077
- जर्मनी- 207,707
- अर्जेंटीना- 173,355
- कनाडा- 116,871
- इराक- 115,332
- कतर-.109,880
- इंडोनेशिया- 102,051
जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 हजारांहून अधिक असलेल्या देशांमध्ये अमेरिका सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत 149,235 नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर पुढे ब्राजिल (88,539), इंग्लंड (45,963), मेक्सिको (44,876), इटली (35,123), भारत (33,425), फ्रान्स (30,226), स्पेन (28,436), पेरू (18,418), ईरान (16,147) आणि रशिया (13,483) अशी ती क्रमवारी आहे.