Coronavirus: जगभरात 50 लाख नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित; 3 लाख 28 हजारांहून अधिक मृत्यू; अमेरिका, रशिया, ब्राझील, इंग्लंड सर्वात आघाडीवर
तर 15 लाख 51 हजार 668 नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची नोंद आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांचा जगभरातील आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा आकडा आता तब्बल 50 लाख रुग्णांवर जाऊन पोहोचला आहे. तर कोरोना व्हायरस संक्रमनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 3 लाख 28 हजार पेक्षाही अधिक झाली आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत जगभरात एकूण 49 लाख 95 हजार 712 नागरिकांना कोरना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर, 3 लाख 28 हजार 95 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ (Johns Hopkins University) संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (CSSE) ही आकडेवारी जाहीर करत असते.
जगभरातील देशांचा विचार करता कोरोना व्हायरस संक्रमनामुळे अमेरिकेत सर्वाधिक कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आहेत. सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत. एकट्या अमेरिकेत 93 हजार 431 नागरिकांचे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाले आहेत. तर 15 लाख 51 हजार 668 नागरिकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची नोंद आहे. अमेरिकेनंतर कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही रशियात आहेत. रशियामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित 3 लाख 8 हजार 705 रुग्ण आहेत. (हेही वाचा, जगभरात कोविड 19 च्या 8 लसींचे क्लिनिकल ट्रायल्स सुरु तर 110 लसी विकासाच्या विविध टप्प्यात- WHO ची दिलासादायक माहिती)
विविध देशातील कोरोना रुग्णांची संख्या
- अमेरिका- 15 लाख 51 हजार 668
- रशिया- 3 लाख 8 हजार 705
- ब्राझिल- 2 लाख 91 हजार 579
- इग्लंड- 2 लाख 49 हजार 619
- स्पेन- 2 लाख 32 हजार 555
- इटली- 2 लाख 27 हजार 364
- फ्रान्स- 1 लाख 81 हजार 700
- जर्मनी- 1 लाख 78 हजार 473
- तुर्की- 1 लाख 52 हजार 587
- इरान- 1 लाख 26 हजार 949
दरम्यान, सीएसएसईच्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संक्रमनामुळे मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडमध्ये 35 हजार 786 नागरिकांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस महामारीमध्ये दहा हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालेल्या देशांमध्ये इटली ( 32 हजार 330), फ्रान्स (28 हजार 135 ), स्पेन (27 हजार 888) आणि त्यानंतर ब्राझील (18 हजार 859) या देशांचा समावेश आहे.