Mask Rules In South Korea: लसीकरण झालेल्यांना मास्क वापरण्याची गरज नाही; US नंतर दक्षिण कोरिया सरकारकडून नागरिकांना सशर्थ सवलत
दरम्यान, आतापर्यंत 60 ते 74 वर्षे वयोगटातील जवळपास 70% नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यातील बहुतेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
अमेरिका (US) पाठोपाठ आणखी एका देशाने नागरिकांना कोरोना महामारीत मास्क न वापरण्यास सशर्थ परवानगी दिली आहे. दक्षिण कोरिया (South Korea) असे या देशाचे नाव आहे. दक्षिण कोरियाने आजच (26 मे) जाहीर केले की कोरोना व्हायरस लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण झाले आहे अशा नागरिकांनी येत्या जुलै 2021 पासून सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी चेहऱ्यावर मास्क (Mask Rules In South Korea) लावण्याची आवश्यकता नाही. वृद्ध नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यासह येत्या सप्टेंबर (2021) महन्यांपर्यंत दक्षिण कोरियाने सुमारे 70% म्हणजेच जवळपास 52 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. सध्या दक्षिण कोरियातील लसिकरणाता दर 7.7% इतका आहे.
पंतप्रधान किम बू-क्यूम (Prime Minister Kim Boo-kyum) यांनी बुधवारी घेतलेल्या एका बैठकीत सांगितले की, लसिकरण झाल्यावर लसीचा कमीत कमी एक जरी डोस घेतलेला असला तरी अशाही नागरिकांना सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी एकत्र येण्यास परवानगी दिली जाईल. (हेही वाचा, America Mask Rules: कोरोना लसीकरण पूर्ण झालल्या नागरिकांनी मास्क लावण्याची आवश्यकता नाही- अमेरिका)
पंतप्रधान किम बू-क्यूम म्हणाले की, 70% नागरिकांचे लसीकरण झाल्यानंतर परिणाम पाहण्यासाठी त्यांना एकत्र विलगीकरणात ठेवण्यात येईल. दरम्यान, आतापर्यंत 60 ते 74 वर्षे वयोगटातील जवळपास 70% नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. त्यातील बहुतेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दक्षिण कोरियातील सुमारे 12,000 क्लिनिक्समधून 65 ते 74 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे.
दरम्यान, अमेरिकेनेही काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे की, ज्या नागरिकांचे कोरोना व्हायरस विरुद्ध लसीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजेच ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावण्याची आवश्यकता नाही. हे नागरिक खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरु शकतात.