Colombian Female DJ हत्या प्रकरणात अमेरिकन व्यक्तीस 42 वर्षेांचा तुरुंगवास
कोलंबियन डीजे व्हॅलेंटीना ट्रेस्पलासिओस (Colombian DJ Valentina Trespalacios Murder Case) हिच्या हत्या प्रकरणात जॉन पौलोस (John Nelson Poulos) या अमेरिकन नागरिकाला 42 वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बोगोटा कोर्टाने हा निर्णय दिला. दोषी आणि 21 वर्षांची पीडिता परस्परांचे मित्र होते.
कोलंबियन डीजे व्हॅलेंटीना ट्रेस्पलासिओस (Colombian DJ Valentina Trespalacios Murder Case) हिच्या हत्या प्रकरणात जॉन पौलोस (John Nelson Poulos) या अमेरिकन नागरिकाला 42 वर्षे सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बोगोटा कोर्टाने हा निर्णय दिला. दोषी आणि 21 वर्षांची पीडिता परस्परांचे मित्र होते. या मैत्रिदरम्यानच आरोपीने पीडितेची हत्या केली. कोर्टाच्या निर्णयानुसार दोषी जॉन पौलोस यास कोलंबियाच्या तुरुंगात राहावे लागेल. उच्चभ्रू महिलांच्या हत्या (Femicide in Colombia) आणि त्याचे वाढते प्रमाण हा कोलंबियात सध्या सामाजिक चर्चा आणि चिंतेचा विषय ठरतो आहे.
गुन्ह्याचा तपशील
जॉन पौलोसने याने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीत मान्य केले की, त्याने लैंगिक संबंधादरम्यान ट्रेस्पलासिओस हिची हत्या केली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली त्याने तिचा गळा दाबला, परिणामी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पॉलॉसने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कचऱ्याच्या डब्यात टाकून आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले. दरम्यान, मैत्रिणीची हत्या केल्यानंतर पौलोस कोलंबियातून पळून गेला. मात्र, तो पनामा शहरातील टोकुमेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडला गेला. त्याच्या बचावाने दावा केला की त्याने ड्रग्सच्या प्रभावामुळे बेशुद्धपणे कृती केली आणि शिक्षेच्या भीतीने त्याने गुन्हा लपविला. न्यायाधीशांनी बचाव पक्षाच्या वकिलाचा युक्तीवाद मान्य केला नाही, कोर्टाने नोंदवले की पौलोसने ईर्षेतून वागला. त्यातूनच त्याने ट्रेस्पलासिओस हीस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा, बांगलादेशच्या खासदाराला हत्या करण्यापूर्वी अडकवले 'हनी ट्रॅप' मध्ये, महिलेला अटक)
व्हिडिओ
निर्णय आणि शिक्षा
पौलोस याने केलेला गुन्हा कोलंबियाच्या कायद्यांतर्गत सर्वात गंभीर गुन्ह्यांपैकी एक मानला गेला. हत्या करणे, गुन्हा दडवणे आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांसह, उत्तेजित स्त्रीहत्येसाठी त्याला दोषी ठरविण्यात आले. त्याला संपूर्ण शिक्षा कोलंबियामध्येच शिक्षा भोगावी लागणार आहे. (हेही वाचा, Man Beheads Boss: चोरी केल्याचे गर्लफ्रेंडला कळू नये म्हणून व्यक्तीने केली बॉसची हत्या; 2020 मध्ये सापडला होता डोके व हात नसलेला मृतदेह)
इन्स्टा पोस्ट
पीडितेची पार्श्वभूमी आणि सार्वजनिक प्रतिक्रिया
Valentina Trespalacios ही कोलंबियन आणि आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक संगीत दृश्यातील एक उदयोन्मुख प्रतिभा होती. जिने स्टीव्ह आओकी आणि दिमित्री वेगास आणि लाइक माईक सारख्या जगप्रसिद्ध DJ सोबत सादरीकरण केले होते. तिच्या निर्घृण हत्येमुळे राष्ट्रीय संताप निर्माण झाला आणि कोलंबियातील लैंगिक हिंसाचाराच्या व्यापक समस्येवर प्रकाश टाकला. खटला तणावाने भरलेला होता, परिणामी आरोपीचे पौलोसचे पहिले वकील मार्टिन रियास्कोस यांनी मृत्यूच्या धमक्यांमुळे राजीनामा दिला.
पाठिमागील काही दिवसांपासून कोलंबीयामध्ये हाय-प्रोफाइल स्त्रीहत्या प्रकरणांच्या मालिका पाहायला मिळत आहे. उच्चभ्रू समाजातील महिलांच्या हत्या हा त्या देशात सध्या चर्चेचा विषय आहे. ही चर्चा समाजामध्ये चिंता आणि गांभर्य वाढवत असतानाच डीजेच्या हत्येचे प्रकरण घडले. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्व स्तरातून अधिक लक्ष वेधले गेले. प्रसारमाध्यमांतूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)