CNG in Pakistan: अबब! पाकिस्तानमध्ये सीएनजी तब्बल 300 रुपये किलो, सामान्यांचे बजेट सपाट

सत्तांतर, सततची राजकीय अस्थितरात यामुळे आगोदरच अस्थिर झालेला पाकिस्तान (Pakistan) आता महागाईमुळे (Inflation in Pakistan) अधिक खोलाच चालला आहे. पाकिस्तानमध्ये CNG दर गगनाला भीडले आहेत. इतके की प्रति 1 किलो गॅससाठी नागरिकांना तब्बल 300 रुपये मोजावे लागत आहेत.

CNG | (File Image)

सत्तांतर, सततची राजकीय अस्थितरात यामुळे आगोदरच अस्थिर झालेला पाकिस्तान (Pakistan) आता महागाईमुळे (Inflation in Pakistan) अधिक खोलाच चालला आहे. पाकिस्तानमध्ये CNG दर गगनाला भीडले आहेत. इतके की प्रति 1 किलो गॅससाठी नागरिकांना तब्बल 300 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमधील वाढत्या सीएनजी (CNG in Pakistan) दरांबाबत डीलर्स असोसिएशनने म्हटले आहे की, सरकार या क्षेत्रालाच संपविण्याचा विचार करते आहे. सीएनजीच्या या किमती कोणाचाही सल्ला न घेता वाढवल्या गेल्या आहेत. एआरवाय न्यूजने शनिवारी आपल्या वृत्तात म्हटले की, 700 रुपयांच्या वाढीसह पाकिस्तानात सीएनजी गॅस दर प्रति किलो 300 रुपयांवर पोहोचले आहेत.

सीएनजी डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल सामी खान यांनी एका प्रतिक्रियेदरम्यान सांगितले की, री-गॅसीफाईड लिक्विड नॅचरल गॅस (आरएलएनजी) ची किंमत वाढविण्यात आली आहे. किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाढीवर नाराजी व्यक्त करत चेअरमन म्हणाले सीएनजी सेक्टरमध्ये गुंतवलेले अब्जावधी रुपये बरबाद झाले आहेत. त्यांनी म्हटले की, सीएनजीला स्वस्त इंधन मानले जात होते. परंतू, मोठ्या प्रमाणावर याचे दर वाढवल्यामुळे त्याची मागणीही आता घटली आहे. त्यांनी असेही म्हटले की, संघीय सरकारला सीएनजी परिसरात स्थानिक दरांवर आरएलएनजी द्यायला हवी. (हेही वाचा, Pakistan: 'माजी मंत्री Sheikh Rashid यांच्या डोक्यावरील विग काढणाऱ्याला मिळणार 50,000 रुपये'; पंतप्रधान Shehbaz Sharif यांच्या सहाय्यकाची घोषणा)

पाकिस्तानची अर्थव्यवस्था मंदीच्या लाटेत आहे. 18 मे पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) सोबत अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरु आहे. अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी म्हटले की, पेट्रोलियम उत्पादनांमुळे सरकारी तिजोरीचे प्रतिमहिना तब्बल 102 अब्ज रुपयांचे नुकसान होत आहे. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले की, सरकार पेट्रोलियम वर प्रति लीटर 30 रुपये नुकसान सहन करत आहे. दरम्यान, पेट्रोलियम उत्पादकांनी किंमती वाढविण्याचा निर्णय आतापर्यंत घेतला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now