Christmas 2018 : नाताळनिमित्त असा सजला व्हाईट हाउस, फर्स्ट लेडीने शेअर केले फोटो आणि व्हिडीओ

या वर्षीची थीमदेखील ख्रिसमस ट्री हीच असावी असे जाणवते

व्हाईट हाउसमधील सजावट (Photo Credits: Twitter/@FLOTUS)

संपूर्ण जगाच्या पाठीवर ख्रिसमस (Christmas) असा एकच सण आहे जो जास्तीत जास्त देशांत  साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे, त्यामुळे या सणाच्या तयारीनेही आता जोर धरायला सुरुवात केली आहे. हटके डेकोरेशन्स, वेगवगेळ्या थीम्स, दिव्यांच्या माळा, फुले यांनी सजलेले रस्ते असे ख्रिसमसचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. अमेरिकेचा ‘व्हाईट हाउस’ (White House) देखील येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीमने सजवला जाणाऱ्या व्हाईट हाउससाठी, या वर्षी कोणत्या थीमचा वापर केला जाणार आहे याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी 2018च्या ख्रिसमस ट्रीचा स्वीकार केल्यानंतर या सजावटीला सुरुवात झाली. ऑफिशियली या सजावटीचे सर्वांसमोर अनावरण करण्याआधीच फर्स्ट लेडीने या सजावटीचे काही फोटोज शेअर केले होते.

व्हाईट हाउसच्या मधोमध एक मोठा ख्रिसमस ट्री ठेवण्यात आला आहे. या वर्षीची थीमदेखील ख्रिसमस ट्री हीच असावी असे जाणवते. व्हाईट हाउस मधील हॉल, खोल्या, आतले रस्ते हे विविध अशा तब्बल 29 ख्रिसमस ट्रींनी सजवले आहेत. या ख्रिसमस ट्रीसुद्धा अक्षरशः नजर दिपून जातील अशा दिव्यांच्या माळांनी सजवले आहेत. भिंतींवर सुंदर फ्रेम्स दिमाखात उभ्या आहेत, छतावर वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे झुंबर लटकवले आहेत. ख्रिसमसच्या या सजावटीमुळे व्हाईट हाउस एखाद्या सुंदर शोपीस सारखा भासत आहे.

ट्रम्प यांच्या राजवतीमधील हा दुसरा ख्रिसमस ते व्हाईट हाउसमध्ये साजरा करणार आहेत. प्रथेप्रमाणे पुढील संपूर्ण एक महिला व्हाईट हाउस जनतेसाठी खुला ठेवण्यात येईल. यामध्ये  संगीतकार, हायस्कूल बँड, चर्चमधील गायक यांसोबतच इतर अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी अनुभवता येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif