Chinese Woman Removes Husband's Life Support: नवरा कोमात, बायको जोमात; मोक्याच्या क्षणी काढला लाईफ सपोर्ट
धक्कादायक म्हणजे रुग्णालयात कृत्रिम जीवनप्रणालीवर असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला त्याबाबत विचारले असता तिने त्याचा लाईफ सपोर्ट (Life Support) काढून टाकण्यास सांगितले.
Husband Wife Relationship Issues: तरुणपणात किंवा सोबत राहायच्या वयामध्ये अविश्वासाने वागणाऱ्या पतीचा चीनमधील एका महिलेने बदला घेतला आहे. अर्थात तिने आपण बदला घेत असल्याचे थेट म्हटले नसले तरी, लोकांनी तिच्या वर्तनाचा तसा अर्थ (Online Debate) काढला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ईशान्य चीनमधील लिओनिंग प्रांतातील 38 वर्षीय पुरुषाला सेरेब्रल हॅमरेज (Cerebral Hemorrhage) झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे रुग्णालयात कृत्रिम जीवनप्रणालीवर असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र, जबाबदार व्यक्ती म्हणून त्याच्या पत्नीची सही आवश्यकता होती. डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला त्याबाबत विचारले असता तिने त्याचा लाईफ सपोर्ट (Life Support) काढून टाकण्यास सांगितले.
महिलेवर टीका
लिओनिंग प्रांतातील या पुरुषाची पत्नी अशी का वागली, याबाबत अनेकांकडून टीका केली जात आहे. लोकांकडून टीका होत असली तरी, सदर महिलेने मात्र भलतेच स्पष्टीकरण दिले आहे. तिने म्हटले आहे की, सदर व्यक्ती माझा पती असला तरी, त्याने आपल्यासोबतचे भावनिक बंध केव्हाच तोडून टाकले होते. त्याने जवळपास 10 वर्षांपूर्वीच आपणाशी नाते तोडले होते. इतकेच नव्हे तर त्याने आपल्याला त्याच्या मालकीणीकडे राहण्यास भाग पाडले होते. त्यामुळे आता कोमात असताना त्याला जीवदान मिळून तरी त्याचाकायउपयोगआहे. (हेही वाचा, UP Shocker: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने घेतला पत्नीचा जीव, नंतर स्वतः केली आत्महत्या)
चिनी कायद्यानुसार रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देणे बंधणकारक
पीडित व्यक्ती रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत आढळून आले की, त्याच्यावर वैद्यकीय उपचार तातडीने होणे आवश्यक आहे. ज्यमध्ये शस्त्रक्रियेचा समावेश आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती रुग्णालयात अनुपस्थित होती. मात्र, काही वेळाने ती रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तिला चिनी नियम आणि कायद्यानुसार कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले. या महिलेने कागदपत्रांवर सही करण्याऐवजी चक्क त्याचा लाईफ सपोर्टच काढायला सांगितले.
डॉक्टरांकडून स्पष्टीकरण
दरम्यान, रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉ. चेन यांनी सांगितले की, रुग्ण कोमात होता आणि त्याच्या शरीरातील गुंतागुंतही मोठी होती. या वेळी महिलेने विचार केला की, शस्त्रक्रिया करुन तो जीवंत राहण्याची शक्यताही कमो होती. शिवाय त्याच्यावर वैद्यकीय उपचारांपोठी होणार खर्चही अधिक आहे. त्यामुळे सारासार विचार करुन महिलेने त्याचा लाईफ सपोर्ट काढण्याचा विचार केला.
वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमामावर
जेव्हा त्या व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया करण्याच्या संमतीसाठी त्याच्या पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ती उपलब्ध नव्हती. काही वेळातच दुसरी महिला रुग्णालयात आली आणि ती त्याची पत्नी असल्याचा दावा करत होती. डॉ. चेन यांनी गंभीर परिस्थितीचे स्पष्टीकरण दिले, ते लक्षात घेतले की रुग्ण कोमात होता आणि शस्त्रक्रियेनंतरही जगण्याची शक्यता कमी होती. वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णाचे आयुष्य तात्पुरते टिकून होते आणि शस्त्रक्रियेचा खर्च खूप जास्त होता, असेही ते म्हणाले.
पतीने तोडले नाते
पत्नीने उघड केले की तिचा पती एका दशकाहून अधिक काळ अविश्वासू होता, त्याने कोणताही भावनिक आधार दिला नाही आणि आर्थिक मदत केली नाही. तिने त्याच्याशी भावनिक जोड गमावला होता आणि संमती फॉर्मवर सही करण्यास नकार दिला होता. त्याऐवजी, तिने डॉक्टरांना तिच्या पतीची जीवनदायी श्वासनलिका काढून टाकण्यास सांगितले.
चिनी कायद्यानुसार डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबाला शस्त्रक्रियेच्या जोखमींबद्दल माहिती देणे आणि रुग्ण निर्णय घेऊ शकत नसल्याच्या आवस्थेत असेल तर संबंधीत शस्त्रक्रियेसंदर्भात त्याच्या कुटुंबाची लेखी संमती मिळवणे आवश्यक आहे. कुटुंब उपचाराशी असहमत असल्यास, रुग्णालयाचे प्रमुख रुग्णाच्या सहमतीशिवाय आवश्यक उपाययोजना करू शकतात.