China मध्ये Coronavirus चा धोका कायम! वुहान सहित देशाच्या काही भागात COVID-19 च्या नव्या 17 रुग्णांची नोंद
विशेष म्हणजे यापैकी 12 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सुद्धा दिसत नव्हती. परिणामी कोरोनाची नवी लक्षणे निर्माण झाली असल्याची शक्यता सुद्धा टाळता येत नाही.
कोरोना व्हायरसची (Coronavirus) सुरुवात झालेल्या चीन (China) मध्ये मागील काही आठवड्यात कोरोनाचे रुग्ण न आढळल्याने किंचित दिलासा होता मात्र आता पुन्हा एकदा चीन मधील वुहान (Wuhan),जिलिन (Jilin) आणि अन्य काही शहरात कोरोनाच्या नव्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी 12 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सुद्धा दिसत नव्हती. परिणामी कोरोनाची नवी लक्षणे निर्माण झाली असल्याची शक्यता सुद्धा टाळता येत नाही. दरम्यान, वुहान मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या सुरु केल्या आहेत. कोरोनाची लक्षणे (COVID19 Asymptomatic) नसलेल्या प्रकरणे आढळणे याचा अर्थ असा की रुग्णांची कोविड 19 पॉझिटिव्ह असूनही ताप, खोकला किंवा अन्य लक्षणे न दिसत नाहीत. मात्र तरीही, त्यांच्या मार्फत हा आजार इतरांपर्यंत पसरला जाऊ शकतो. जगभरात कोविड 19 च्या 8 लसींचे क्लिनिकल ट्रायल्स सुरु तर 110 लसी विकासाच्या विविध टप्प्यात- WHO ची दिलासादायक माहिती
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) रविवारी सांगितले की शनिवारी जिलिन प्रांतात कोरोना व्हायरसची पाच प्रकरणे नोंदविली गेली, ज्यात स्थानिक स्तरावर संपर्कातून तिघांना लागण झाली आहे. नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणांच्या क्लस्टरची नोंद झाल्यानंतर जिलिन शहर या आठवड्यात लॉकडाऊनमध्ये गेले आहे. तर दुसरीकडे वुहान मध्ये सुद्धा कोरोनाची 6 नवीन प्रकरणे आढळून आली यातील २ जणांची प्रकृती गंभीर आहे असेही आरोग्य आयोगाने सांगितले आहे. कोरोना व्हायरसची लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
दरम्यान, शनिवारपर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 82,947 इतकी होती. एकूण रुग्णांपैकी केवळ 86 रुग्णांवर उपचार सुरू होते, तर, 78,227 लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. कोरोनामुळे चीन मध्ये 4,634 लोकांचा बळी गेला आहे. तर आता समोर येणाऱ्या लक्षणे नसणाऱ्या रुग्णांच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढत आहे.