Coronavirus: चीनमुळेच जगातील अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटली; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप
परिणामी, अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. जगाच्या अतोनात नुकसानाला केवळ चीन जबाबदार आहे, असा दावा अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे.
चीनमध्ये (China) जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. परिणामी, अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. जगाच्या अतोनात नुकसानाला केवळ चीन जबाबदार आहे, असा दावा अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट केले आहे. ज्यात ट्रम्प म्हणतात की, अमेरिकेसह जगभरात जे काही अतोनात नुकसान होत आहे, त्याला एकमेव चीन जबाबदार आहे. चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोनाचे जाळे पसरत गेले. मिळालेल्या माहितीनुसार, 170 हून अधिक देश कोरोनाचे शिकार ठरले आहेत. मात्र, सर्वाधिक नुकसान अमेरिकेचे झाले आहेत. सध्याच्या घडीला कोरोनाच्या सगळ्यात जास्त केसेस या अमेरिकेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. अमेरिकेसह जगाच्या अतोनात नुकसानाला चीन जबाबदार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही चीनवर या कोरोनावरून आरोप केले आहेत. तसेच त्यांनी कोरोनाला चायना व्हायरस असे नावदेखील दिले आहे. एवढेच नव्हेतर अमेरिकेत जे काही नुकसान होत आहे, याला चीन जबाबदार असल्याचेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- India China Tension: NSA अजीत डोभाल यांच्या चीन परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चेनंतर LAC वर चीन सामंजस्याच्या भूमिकेत
डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीट-
कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानावर आहे. सध्या अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रग्ण आढळले असून आतापर्यंत 1 लाख 30 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. मात्र, अमेरिका, भारत यांच्यासह जगातल्या प्रमुख देशांना या रोगाचा सर्वाधिक फटका बसला आहे.