छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू शेखला अटक; सोबत मिळाला पाकिस्तानी पासपोर्ट

अबू धाबीच्या विमानतळावरून शकीलचा भाऊ अनवर बाबू शेखला (Anwar Babu Shaikh) पोलिसांनी अटक केली आहे.

डॉन छोटा शकील (Photo Credits YouTube)

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Daud Ibrahim)चा अतिशय विश्वासू असलेल्या छोटा शकील (Chhota Shakeel)चा भाऊ याला अटक करण्यात आली आहे. अबू धाबीच्या विमानतळावरून शकीलचा भाऊ अनवर बाबू शेखला (Anwar Babu Shaikh) पोलिसांनी अटक केली आहे. अन्वरकडे पाकिस्तानी पासपोर्टदेखील मिळाला आहे. बरेच दिवस पोलीस अन्वरच्या मागावर होते. अन्वरच्या नावे रेड कॉर्नर नोटिसही निघाली होती. या घटनेमुळे भारतीय पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस दुबई पोलिसांच्या संपर्कात आहे.

12 मार्च, 1993 साली मुंबईमध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या स्फोटात 257 निष्पापांचा बळी गेला होता, तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते.याप्रकरणी 129 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यामध्ये दाऊद इब्राहिमसह छोटा शकील आणि अनवर बाबू शेखही सामील होते. (सविस्तर वृत्त लवकरच ...)



संबंधित बातम्या