IPL Auction 2025 Live

Statue Missing Of Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अमरिकेतून गायब, कॅलिफोर्निया येथील उद्यानातील घटना

कॅलिफोर्निया येथील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील (Guadalupe River Park) पुतळा हा पुणे येथील सॅन जोसच्या भगिनी यांनी शहराला भेट म्हणून दिला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | (Photo Credits: Twitter/IANS)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा कॅलिफोर्निया शहरातील सॅन जोस उद्यानातून ( San Jose Park ) कथीतरित्या गायब झाला आहे. कॅलिफोर्निया येथील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील (Guadalupe River Park) पुतळा हा पुणे येथील सॅन जोसच्या भगिनी यांनी शहराला भेट म्हणून दिला होता. उल्लेखनीय असे की, उत्तर अमेरिकेत (North America) असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता.

सॅन जोस डिपार्टमेंट ऑफ पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसने ट्विट करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गायब झाल्याची माहिती दिली. अधिकृत व्यवस्थापनाने 3 फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोकांना हे सांगण्यास आम्हाला अत्यंत दु:ख आणि खेद होतो आहे की, ग्वाडालुपे रिव्हर पार्क येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गायब झाला आहे. दरम्यान, हा पुतळा नेमका कधीपासून गायब आहे. तो कोणी काढला, याबाबत मात्र अधकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे ट्विट केले नाही अथवा माहितीही दिली नाही. (हेही वाचा, Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 223: आगरा येथील लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास SSI चा नकार, शिवप्रेमींकडून न्यायालयात याचिका दाखल)

ट्विट

दरम्यान, सॅन जोस डिपार्टमेंट ऑफ पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसने केलेल्या ट्विटमध्ये एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो. छत्रती शिवाजी महाराज यांचा हा अश्वरुढ पुतळा आहे. मात्र, हा फोटो पुतळा बेपत्ता होण्यापूर्वीचा आहे. सोबतच संबंधित विभागाने त्याच ट्विटमध्ये आणखी एक फोटो जोडा आहे. ज्यात पुतळ्याचा फोटो दिला आहे मात्र त्यात दिसते की, फोटोत आता बेपत्ता झालेल्या पुतळ्याचा फोटो फक्त पाया शिल्लक आहे. उद्यान व्यवस्थापनाने महिती देताना पुतळा बेपत्ता कसा झाला याबाबत तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.