Hindu Temple Vandalised in Windsor: कॅनडा मध्ये हिंदू मंदिरावर पुन्हा भारत आणि हिंदू विरोधी ग्रॅफिटी; 2 संशयित पोलिसांच्या निशाण्यावर

Windsor Police Service या प्रकरणात 2 व्यक्तींचा शोध घेत आहेत आणि तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे

Canada | Twitter

कॅनडा (Canada) मध्ये पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ताजी घटना Windsor मधील आहे. दोन मास्कधारी व्यक्तींनी मंदिरावर काही आक्षेपार्ह मेसेज लिहला आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेतलेली आहे. Windsor police कडून एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. ज्यामध्ये मंदिराच्या बाहेरील बाजूला भिंतीवर एक व्यक्ती ग्राफिटी स्प्रे करत असल्याचं दिसत आहे. Windsor Police Service या प्रकरणात 2 व्यक्तींचा शोध घेत आहेत आणि तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

ऑफिशिअल स्टेटमेंट नुसार, 5 एप्रिल 2023 दिवशी पोलिसांनी त्यांचे अधिकारी मंदिराजवळ झालेल्या घटनेचा शोध करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे म्हटलं आहे. हा hate-motivated vandalism चा प्रकार आहे. मंदिरावर अ‍ॅन्टी हिंदू आणि अ‍ॅन्टी इंडिया ग्रॅफिटी करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना रात्री 12 च्या सुमाराची आहे. यामध्ये एका संशयिताने ब्लॅक स्वेटर आणि ब्लॅक पॅन्ट घातली आहे. त्याच्या डाव्या पायावर एक पांढरा लोगो दिसत आहे. पायात काळे-पांढरे रनिंग शूज आहेत. दुसर्‍या संशयिताने ब्लॅक पॅन्ट घातली आहे. स्वेटशर्ट आहे. सोबत ब्लॅक शूज आणि व्हाईट सॉक्स घातले आहेत.

पोलिसांनी स्थानिकांना त्यांचे होम सर्व्हिलंस कॅमेरा तपासण्याचे आदेश दिले आहेत. रात्री 11 ते 1 दरम्यानचे फूटेज तपासून त्यामधून संशयितांबद्दल धागेदोरे तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.