Bubonic Plague In US: यूएसमध्ये दुर्मिळ बुबोनिक प्लेग; 14 व्या शतकात झाला होता तब्बल 50 दशलक्ष लोकांचा मृत्यू
अमेरिकेमध्ये दुर्मिळ अशा ब्युबेनिक प्लेगचे (Rare case of Bubonic Plague) रुग्ण आढळून आले आहेत. यूएस आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केली आहे. या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, येथील काही स्थानिक नागरिक ब्यूबोनिक प्लेग (Bubonic Plague) संक्रमित असल्याचे पुढे आले आहे.
Bubonic Plague in US: अमेरिकेमध्ये दुर्मिळ अशा ब्युबेनिक प्लेगचे (Rare case of Bubonic Plague) रुग्ण आढळून आले आहेत. यूएस आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केली आहे. या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, येथील काही स्थानिक नागरिक ब्यूबोनिक प्लेग (Bubonic Plague) संक्रमित असल्याचे पुढे आले आहे. प्लेगचे हे संक्रमन नागरिकांना पाळीव मांजरांपासून झाले असण्याची प्राथमिक शक्यताही या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मांजरांच्या संपर्कात असलेल्या तसेच, प्लेगचा संसर्ग झालेल्या नागरिकांना आवश्यक औषधोपचार करण्यात आला आहे. त्यांच्यात होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे डिस्च्यूट्स काऊंटीचे आरोग्य अधिकारी डॉ. रिचर्ड फॉसेट यांनी म्हटले आहे.
ब्यूबोनिक प्लेग संसर्ग आणि लक्षणे
काऊंटी प्रशासनाने म्हटले आहे की, दुर्मिळ प्लेगचा संसर्ग झालेल्या नागरिकांना संसर्ग झाल्याच्या प्राथमिक अवस्थेतच शोधण्यात आले. ज्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यातच वैद्यकीय उपचार करण्यात आले. ज्यामुळे त्यांचा इतर समुदयाला असलेला संभाव्य धोका कमी झाला. एखादा व्यक्ती ब्यूबोनिक प्लेग संसर्ग झालेल्या मांजर अथवा प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर साधारण दोन ते आठ दिवसांनी त्याला ताप, मळमळ, अशक्तपणा, थंडी वाजणे, स्नायू दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात. (हेही वाचा, Bubonic Plague आजाराची लक्षणं काय? जीवाला धोका किती? जाणून घ्या का म्हणतात याला 'Black Death'!)
वेळीच निदान आणि उपचार महत्त्वाचे
डॉक्टर सांगतात की, बुबोनिक प्लेगचे निदान जितक्या लवकर होईल तेवढे महत्त्वाचे असते. या आजाराचा संसर्ग वाढत गेला तर तो फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतो. तो फुफ्फुसापर्यंत पोहोचला की, उपचारांना फारशी संधी नसते. ज्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळ त्वरीत उपचार घेणे आणि निदान होणे अतिशय महत्त्वाचे असते. बुबोनिक प्लेगची अलिकडील काळातील सर्वात शेवटची साथ ही 2015 मध्ये नोंदवली गेली. (हेही वाचा, Coronavirus: केवळ कोरोना व्हायरस नव्हे, या आधीही भारतात आल्या अनेक साथी, ज्याने घेतले लक्षवधी नागरिकांचे प्राण)
आजाराच्या संसर्गाची कारणे
बुबोनिक प्लेग, ज्याला बऱ्याचदा फक्त "प्लेग" म्हणून संबोधले जाते. हा यर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे होणारा एक गंभीर जीवाणूजन्य संसर्ग आहे. हा प्लेगच्या तीन मुख्य प्रकारांपैकी एक आहे, इतर दोन म्हणजे न्यूमोनिक प्लेग आणि सेप्टिसेमिक प्लेग. बुबोनिक प्लेग प्रामुख्याने उंदीर, गिलहरी आणि कुत्रे यांसारख्या प्राण्यांवरील संक्रमित पिसांच्या चाव्याव्दारे पसरतो. उपचार न केल्यास बुबोनिक प्लेग वेगाने वाढू शकतो. ज्यामुळे न्यूमोनिक किंवा सेप्टिसेमिक प्लेग सारख्या आजाराचे अधिक गंभीर स्वरूप उद्भवू शकतात.
बुबोनिक प्लेग संपूर्ण मानवी इतिहासातील विनाशकारी साथीच्या रोगांसाठी ओळखला गेला. विशेषतः 14 व्या शतकातील ब्लॅक डेथ, ज्याने युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील लाखो लोकांचा बळी घेतला. ब्लॅक डेथला रेकॉर्ड केलेल्या इतिहासातील सर्वात प्राणघातक साथीच्या रोगांपैकी एक मानले जाते. आज, बुबोनिक प्लेग तुलनेने दुर्मिळ आहे आणि लवकर निदान झाल्यास त्यावर प्रतिजैविकांनी प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात. तथापि, जगाच्या काही भागांमध्ये, विशेषत: ज्या प्रदेशांमध्ये स्वच्छता खराब आहे आणि जिथे मानव संक्रमित प्राणी किंवा पिसू यांच्या संपर्कात येतात अशा प्रदेशांमध्ये अजूनही याचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)