Prison Officer Sex with Prisoner: तुरुंग अधिकाऱ्याचे कैद्यासोबत शरीरसंबंध; Video Viral होताच गुन्हा कबूल

सदर प्रकाराचे चित्रीकरण झाल्यानंतर आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर संबंधीत महिला अधिकाऱ्यास गैरवर्तन ( Prison Misconduct) केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे.

Linda De Sousa Abreu | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एका ब्रिटीश महिला तुरुंग अधिकाऱ्याने तुरुंगातील कोठडीत एका कैद्यासोबत लैंगिक संबंध (Prison Officer Sex with Prisoner) ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सदर प्रकाराचे चित्रीकरण झाल्यानंतर आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर संबंधीत महिला अधिकाऱ्यास गैरवर्तन ( Prison Misconduct) केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. लंडनच्या वँड्सवर्थ तुरुंगात (Wandsworth Prison) हा प्रकार घडला. 30 वर्षीय लिंडा डी सौसा अब्रू (Linda De Sousa Abreu) ही महिला अधिकारी एका कैद्यासोबत कथितरित्या लैंगिक कृत्य करताना व्हिडिओमध्ये आढळून आले आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या कैद्याने रेकॉर्ड केला होता आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 27 जून रोजी घडली. लैंगिक क्रियेमध्ये ही महिला अधिकारी स्वत:हून सहभागी झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. ज्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अभियोक्ता टेटेह टर्कसन यांनी म्हटले आहे की, डी सौसा हीने केलेले कृत्य उत्साहाच्या भरात केले असले तरी, ते चुकीचे आहे. तिच्या वर्तनामुळे ती जबाबदारी विसरल्याचे निष्पन्न होते. परंतू, तिने सार्वजनिक विश्वासाचाही भंग केला आहे. (हेही वाचा, Female Teacher’s Sex With Student: अल्पवयीन मुलासोबत शेतात लैंगिक संबंध; मास्तरीण बाईंच्या शिकवणीवर आजीवन बंदी)

न्यायालयीन कार्यवाही

पश्चिम लंडनमधील इस्लेवर्थ क्राउन कोर्टहाऊसमध्ये लिंडा डी सौसा अब्रू सोमवारी हजर झाली. पांढरी पँट, एक तपकिरी टॉप आणि त्यावर एक जुळणारे पांढरे जाकीट परिधान करुन ती कोर्टात आली होती. तिने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे कोर्टानेही तिला सार्वजनिक कार्यालयातील गैरवर्तनाच्या एका गणनेसाठी दोषी ठरविले. ज्यामुळे जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला असून, ती 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयात परतणार आहे. तिच्या वकिलांनी अद्याप निवेदन दिलेले नाही. (हेही वाचा, Sex With Student: शिक्षिकेने केला 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत सेक्स, गर्भवती झाल्याचा दावा)

अटक आणि चौकशी

लिंडा डी सौसा अब्रू ही तुरुंगात अधिकारी आहे. शिवाय ती आईदेखील आहे. या महिन्याच्या सुरुवातीसच तिला अटक झाली. पोर्तुगीज पासपोर्ट असलेल्या अब्रूला हिथ्रो विमानतळावर पकडणयात आले. तिने तिच्या नियोक्त्यांना ती कामावर परतणार नसल्याचे कळवल्यानंतर माद्रिदला जाण्याचा प्रयत्न करताना तिला पकडण्यात आले. आपल्याला झालेल्या अटकेबद्दल लिंडा डी सौसा अब्रु हिने मौन बाळगले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच तिने पॉर्नस्टार्स विरोधात एक वक्तव्य केले होते. हे वक्तव्य थेट पॉर्नस्टारशी संबंधित नव्हते तर, सोशल मीडियावर जे चाहते तिची तोतयागिरी करत होते, त्यांना उद्देशून होते. तिच्या कृत्यामुळे अनेकांकडून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.