Blasts In Pakistan: पाकिस्तानमध्ये स्फोट, 12 पोलीस ठार,  40 पेक्षा जास्त लोक जखमी

या स्फोटात 12 पोलीस आणि सुमारे 40 पेक्षाही अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सामनान्य नागरिकांसह काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Blasts In Pakistan | (Image Credit - ANI Twitter)

Blasts In Pakistan at Swat's Kabal: पाकिस्तानमधील स्वात (Swat) प्रांतातील  कबाल (Kabal) परिसर सोमवारी दोन ठिकाणी झालेल्या स्फोटांनी दणाणून गेला. या स्फोटात 12 पोलीस आणि सुमारे 40 पेक्षाही अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सामनान्य नागरिकांसह काही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. वृत्तसंस्था एएनआयने जिओ न्यूजच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. या स्फोटाबद्दल खैबर पख्तुनख्वा पोलीस महानिरीक्षक अख्तर हयात खान यांनी माहिती देतानासांगितले की, परिसरातील सर्व यंत्रणा 'हाय अलर्ट'वर आहे.

कबाल येथे झालेला हल्ला आत्मघातकी हल्ला असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, पाकिस्तानच्या काउंटर टेररिझम डिपार्टमेंट (CTD) विभागाचे DIG खालिद सोहेल यांनी यांनी हे वृत्त फेटाळून लावत जीओ न्यूजला माहिती देताना सांगितले की, हा हल्ला आत्मघातकी नव्हता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पोलीस स्टेशनवर हल्ला झाला नाही. परिसरात एका ठिकाणी दारुगोळा आणि मोटार्स गोडाऊन होते. त्यात हा स्फोट झाल्याने दुर्घटना घडली.

दरम्यान, सर्व घटनेचा चहुबाजूंनी तापस केला जात आहे. बॉम्बशोधक पथकांनाही पाचारण करण्यात आला असून, परिसरात कसून तपास केला जात आहे. खालिद सोहेल यांनी पुढे म्हटले की, एकूण दोन स्फोट झाले. त्यापैकी एका स्फोटामध्ये एक इमारत कोसळली. जी खूपच जुनी आणि जीर्ण झाली होती. मात्र, या इमारीतमध्ये अनेक कार्यालये होती. स्फोटाची घटना घडल्यानंतर स्वात येथील रुग्णालयांमध्ये एकच धावपळ उडाली. ज्यामुळे स्थानिक पातळीवर आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली. (हेही वाचा, Pakistan Madrasas Producing Gays: 'समलिंगी मुलांची निर्मिती करणारा उद्योग बनला आहे पाकिस्तानातील मशिदी-मदरसे', मौलानाचा विवादित व्हिडिओ व्हायरल (Watch))

सीडीटी विभागाचे DIG खालिद सोहेल यांनी हा आत्मघातकी हल्ला झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती दु:ख व्यक्त केले. तसेच, जखमींना लवकर आराम पडावा यासाठी प्रार्थनाही केली, असे जिओ न्यूजने म्हटले आहे. रेडिओ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांनी (पंतप्रधानांनी) अधिकाऱ्यांना या घटनेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनीसुद्धा या स्फोटाचा निषेध केला आणि घटनेत मृत्यू झालेल्यांप्रती दुःख व्यक्त केले. दहशतवादाचा हा विळखा लवकरच उखडून टाकला जाईल, असे विधानही त्यांनी केले. सांगितले जात आहे की, या स्फोटाचा वर्षाच्या सुरुवातीपासून तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या नावाने ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तानी तालिबानशी मोठ्या पोलीस तळांवर झालेल्या दोन हल्ल्यांचा संबंध आहे.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Satta Matka Online: टेक्नोलॉजी ने कसा बदलला सट्टा मटका चा खेळ; जाणून घ्या फायदे आणि धोके

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील