लाहोरमधील दर्ग्याबाहेर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला, हल्ल्यात 4 लोकांचा मृत्यू
लाहोरमध्ये (Lahor)दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे.
दहशतवाद्यांची हल्ल्याची मालिका सुरु असताना, पाकिस्तानमधील(Pakistan) लाहोरमध्ये (Lahor)दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. हा हल्ला लाहोरच्या सुफी दर्ग्याजवळ झाला. ह्या भीषण हल्ल्यात (Blast) आतापर्यंत 4 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
ह्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पंजाब पोलिसांच्या एलिट फोर्सच्या गाडीला निशाना बनवून हा स्फोट घडवून आणला. ह्या स्फोटात मृत्यांमध्ये एक पोलीस जवानाचाही समावेश आहे.
मागील महिन्यात पाकिस्तानातील क्वेटा शहरात झालेल्या स्फोटात जवळपास 20 लोक मारले गेले होते, तर 48 लोक गंभीर जखमी झाले होते. ह्यात मृत पावलेल्या लोकांपैकी बरेच लोक शिया हजारा समुदायाचे होते. तेच ह्या महिन्यात पुन्हा झालेल्या ह्या हल्ल्यामुळे संपुर्ण पाकिस्तान हादरुन गेला आहे.
ह्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ह्या शहरातून ये-जा करणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ह्या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.