Bizarre CV Experiment: गुगलच्या माजी कर्मचाऱ्याने रेझ्युमेमध्ये लिहिले 'Expert in Mia Khalifa'; मुलाखतीसाठी आले 29 कॉल्स, तरुणाने शेअर केली अनोख्या प्रयोगाची कहाणी

यासह त्याने आपल्या रेझ्युमेमध्ये, आपण मिया खलिफावर वेगवेगळ्या कौशल्यांसह तज्ञ असल्याचे नमूद केले.

Mia Khalifa (फोटो सौजन्य - Instagram)

आजच्या स्पर्धात्मक काळात कोणत्याही प्रकारची नोकरी मिळवणे सोपे नाही. त्यामुळे कठोर परिश्रमाबरोबरच स्मार्ट वर्कही केले पाहिजे. जर तुम्हाला खाजगी क्षेत्रात नोकरी करायची असेल, तर अभ्यासासोबत खूप चांगला बायोडाटा असणे अनिवार्य आहे. रेझ्युमे जितका चांगला आणि अद्वितीय असेल तितक्या लवकर तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल येईल. आता रेझ्युमेचे महत्त्व अधोरेखित करणारी एक हास्यास्पद बाब समोर आली आहे. गुगलच्या (Google) एका माजी कर्मचाऱ्याने आपल्या रेझ्युमेमध्ये ‘मिया खलिफा’चा (Mia Khalifa) उल्लेख केला, त्यानंतर त्याला मुलाखतीसाठी तब्बल 29 कॉल्स आले.

अहवालानुसार, जेरी ली नावाच्या तरुणाने आपल्या बायोडाटामध्ये लिहिले आहे की, त्याने 3 वर्षे गुगलमध्ये स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केले आहे. यासह त्याने आपल्या रेझ्युमेमध्ये, आपण मिया खलिफावर वेगवेगळ्या कौशल्यांसह तज्ञ (Expert in Mia Khalifa) असल्याचे नमूद केले. तसेच गुगलमध्ये काम केलेल्या जेरी लीने आपल्या बायोडेटामध्ये एका रात्रीत सर्वाधिक वोडका शॉट्सचा विक्रम बनवण्यासारख्या कामगिरीचाही उल्लेख केला आहे. त्यानंतर त्याला अनेक बड्या कंपन्यांसह 29 कंपन्यांकडून मुलाखतीसाठी फोन आले.

जेरी लीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर त्याच्या बायोडाटाची प्रत अपलोड केली आहे. या तरुणाने आपल्या बायोडाटाला किस माय नट्स असे नाव दिले होते. तरुणाच्या म्हणण्यानुसार, त्याला मोंगोडीबी आणि रॉबिनहूडसारख्या मोठ्या कंपन्यांनी मुलाखतीसाठी बोलावले होते. आता या पोस्टची सोशल मीडिया साईट्सवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (हेही वाचा: Tech Layoffs 2024: टेक इंडस्ट्री नोकरकपात सुरूच; 2024 मध्ये 451 कंपन्यांनी सुमारे 1,39,206 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले- Report)

जेरी लीने एका सामाजिक प्रयोग म्हणून असा रेझ्युमे तयार केला होता. कंपन्यांनी त्याचा बायोडाटा वाचला की नाही हे त्याला पाहायचे होते व यासाठी त्याने मिया खलिफा या नावाची मदत घेतली. मियाने 2014 मध्ये पोर्नोग्राफीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि अवघ्या दोन महिन्यांत ती ॲडल्ट साइटवर सर्वाधिक सर्च केलेली अभिनेत्री बनली होती. आता याच मिया खलिफामुळे जेरी लीला मुलाखतीचे कॉल्स आले आहेत.