Bird Flu: अर्जेंटिना आणि उरुग्वेमध्ये आढळले बर्ड फ्लूचे रुग्ण

त्यामुळे ब्राझीलमध्ये (Brazil) धोक्याची घंटा वाजली आहे. दरम्यान, शेजारी देश अर्जेंटिना (Argentina) आणि उरुग्वेमध्येही (Uruguay) बर्ड फ्लूचे काही रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. बीएनओ न्यूजने याबाब वृत्त दिले आहे.

Chicken (Photo Credits: Pixabay)

दक्षिण अमेरिकेत (South America ) बर्ड फ्लू (Bird Flu) आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये (Brazil) धोक्याची घंटा वाजली आहे. दरम्यान, शेजारी देश अर्जेंटिना (Argentina) आणि उरुग्वेमध्येही (Uruguay) बर्ड फ्लूचे काही रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. बीएनओ न्यूजने याबाब वृत्त दिले आहे. ब्राझीलचे कृषी मंत्री कार्लोस फावारो यांनी माहिती देताना पत्रकार परिषदेत सांगितले की, ब्राझील, जगातील सर्वात मोठा चिकन निर्यातदार आहे. त्यामुळे या ठिकाणीच व्हायरसचा प्रसार होत असल्याने उद्रेक रोखण्यासाठी उपायांना चालना दिली जाईल.

आत्तापर्यंत, ब्राझीलच्या सीमेला लागून असलेल्या बोलिव्हिया आणि पेरू आणि इक्वाडोरमध्ये व्यावसायिक शेती करणाऱ्या काही फर्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान, उरुग्वे आणि अर्जेंटिनामध्ये वन्य पक्ष्यामध्येही बर्ड फ्यू असल्याची पुष्टी झाली, असे फवारो म्हणाले.

दरम्यान फवारो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिओ ग्रॅन्डे डो सुल राज्यातील वन्य पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची संशयास्पद लक्षणे आढळली. जिथे बरेच ब्राझिलियन मीटपॅकर्स कार्यरत आहेत. दरम्यान, या राज्यातील पाळीव पक्षी, बदके आणि कोंबडींमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आहेत.