व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा, कोरोनामुळे कोणी मरणार नाही!'या' देशाच्या राष्ट्रपतींचा नागरिकांना अजब गजब सल्ला

"तुम्ही कोणीही काळजी करू नका, यापुढे देशात कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू होणारही नाही तुम्ही व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा आणि फिट राहा" असे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांनी नागरिकांना सांगितले आहे.

Alcohol. Image Used For Representative Purpose Only. (Photo Credits: Pixabay)

जगभरावर कोरोनाचे (Coronavirus) भीषण संकट असताना, हजारो रुग्ण मृत्यू पावले असताना आणि लाखो रुग्ण मृत्यूशी रोज झुंज देत असताना बेलारूस (Belarus) या देशाच्या राष्ट्रपतींनी नागरिकांना एक अजब गजब सल्ला दिला आहे. "तुम्ही कोणीही काळजी करू नका, यापुढे देशात कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू होणारही नाही तुम्ही व्होडका प्या, ट्रॅक्टर चालवा आणि फिट राहा" असे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को (Alexander Lukashenko) यांनी नागरिकांना सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार, बेलारूस मध्ये 2,919 कोरोना रुग्ण असून यापैकी 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही देशात लॉक डाऊन (Lockdown) लागू करण्यात आलेले नाही, इतकंच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या ईस्टरच्या सणानिमित्त देखील देशात चर्च सुरु होती. Fact Check: कोरोनाच्या भीतीने बेल्जीयम मध्ये Group Sex वर सक्तीची बंदी? जाणून घ्या सत्य

अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी लोकांना व्होडका पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यामते व्होडका प्यायल्यामुळे शरिरात उष्णता वाढेल. मद्यपान करणे, ट्रॅक्टर चालवणे, बकरीसोबत खेळण्याने हा आजार बरा होईल. तसेच आपल्याकडे अशा काही लस आहेत ज्याने कोरोना नियंत्रणात राहील त्यामुळे कोणीही काळजी करू नये. असे लुकाशेन्को यांनी सांगितले आहे., 'कोरोनाला रोखण्यासाठी औषधे आम्ही शोधली आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची गरज नाही', असे लुकाशेन्को यांनी सांगितले होते, मात्र हे औषध कोणते याविषयी त्यांनी खुलासा केलेला नाही.

दरम्यान डॉक्टर आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रपती लुकाशेन्को हे कोरोनाला गांभीर्याने घेत नाही आहे. यामुळे बर्‍याच लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रपती अलेक्झांडर यांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. अशाही चारचा ब्रिटिश माध्यमात आहेत, मागील 25 वर्षांपासून अलेक्झांडर लुकाशेन्को हे बेलारुसचे राष्ट्रपती आहेत त्यांना अनेकदा हुकूमशाह म्हणूनही माध्यमांनी संबोधले आहे.