Barack Obama यांच्या हायस्कूल जर्सीने बनवला जागतिक विक्रम; तब्बल 1 कोटी 40 लाखात झाला लिलाव
बास्केटबॉल सामन्या दरम्यान ओबामा यांनी ही जर्सी परिधान केली होती.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी हायस्कूलमध्ये परिधान केलेल्या जर्सीचा (Basketball Jersey) लिलाव झाला आहे. बास्केटबॉल सामन्या दरम्यान ओबामा यांनी ही जर्सी परिधान केली होती. विशेष म्हणजे या लिलावात अमेरिकेच्या प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू लेबरॉन जेम्सच्या जर्सीच्या लिलावाचा विक्रम ओबामा यांच्या जर्सीने मोडला आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ओबामांनी परिधान केलेली ही जर्सी लिलावात 192,000 डॉलर्स (सुमारे 1 कोटी 40 लाख) मध्ये विकली गेली. बराक ओबामांच्या या पांढऱ्या जर्सीचा क्रमांक 23 आहे.
निवृत्त एनबीएचे दिग्गज मायकेल जॉर्डन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि एनएफएलचे माजी क्वार्टरबॅक कॉलिन केपर्निक यांनी परिधान केलेल्या जर्सी लिलावात ठेवल्या होत्या. यामध्ये ओबामांच्या जर्सीने जागतिक विक्रम नोंदविला. शुक्रवारी संपलेल्या चार दिवसीय लिलावात एनबीए चार लॉस एंजेलिस लेकर्स स्टार लेब्रोन जेम्सच्या जर्सीचाही समावेश होता. बास्केटबॉल सामने आणि मालिका आयोजित करणारी एनबीए ही अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे.
बराक ओबामा यांनी 1979 मध्ये ही जर्सी परिधान केली होती. त्यावेळी ते हायस्कूलमध्ये होते. हवाईच्या पुनाहौ स्कूलमध्ये बास्केटबॉल सामन्यादरम्यान त्यांनी ती परिधान केली होती. आता या जर्सीचा लिलाव झाला व ती हायस्कूल जर्सीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बोली ठरली. (हेही वाचा: Akshata Murthy या Queen Elizabeth पेक्षा श्रीमंत; पहा Infosys च्या नारायण मूर्तींच्या लेकीची संपत्ती किती?)
दरम्यान, मागच्यावर्षी बराक ओबामा यांची बास्केटबॉल जर्सी 85.40 लाख रुपयांना विकली गेली होती. हेरिटेज ऑक्शन हाऊसने ही माहिती दिली. ही 23 क्रमांकाची जर्सी 1978 ते 1979 दरम्यान वयाच्या 18 व्या वर्षी ओबामांनी शाळेत परिधान केली होती. ही जर्सी त्यांचे स्कूल ज्युनियर 55 वर्षीय पीटर नोबल यांनी लिलावासाठी ठेवली होती. यासाठी सुमारे 27 बिड लावल्या गेल्या. ही जर्सी अमेरिकन आणि क्रीडा कलाकृतींच्या संग्राहकाने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे, मात्र, त्यांचे नाव उघड केले नाही.