अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांच्याबाबत एका व्यक्तीने मोठा खुलासा केला आहे. फॉक्स न्यूजचे माजी अँकर टकर कार्लसन यांच्या मुलाखतीत, लॅरी सिंक्लेअर (Larry Sinclair) नावाच्या व्यक्तीने बराक ओबामा यांनी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, ओबामा सेक्स करण्यापूर्वी सिगारेट ओढायचे. याशिवाय त्यांना ड्रग्जचेही व्यसन होते. या व्यक्तीने 2008 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीही असे दावे केले होते.
आपल्या दावे खरे असून त्याबाबत आपण शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास तयार असल्याचे लॅरी सिंक्लेअर सांगतो, तसेच आपली लाय डिटेक्टर चाचणी देखील केली जाऊ शकते असेही तो म्हणाला. सोशल मिडियावर सिंक्लेअरचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या फक्त मुलाखतीचा टीझर समोर आला आहे. संपूर्ण मुलाखती समोर आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होईल.
A man who claims he had sex with Barack Obama in 1999 tells his story.
Wednesday. 6pm ET. pic.twitter.com/iDYMSww1KS
— Tucker Carlson (@TuckerCarlson) September 5, 2023
आपल्या दाव्यांबद्दल, सिंक्लेअरने सांगितले की, त्याने बराक ओबामा यांना कोकेन विकत घेण्यासाठी $250 दिले होते. पुढे त्यांना ड्रग्ज घेण्यासाठी सीडीचा ट्रे हवा होता, मात्र बराक लहान पाईपमधून धुम्रपान करू लागले. त्यानंतर सिंक्लेअरने बराक यांच्या मांड्यांवर हात फिरवण्यास सुरुवात केली, ज्याला बराक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढे सिंक्लेअरला जे हवे होते ते घडले. (हेही वाचा: Pakistan Shocker: रुग्णालयातील डॉक्टरांनी 23 वर्षीय हिंदू महिलेला गुंगीचे औषध देऊन केला सामूहिक बलात्कार; पीडितेची प्रकृती चिंताजनक)
सिंक्लेअरने दावा केला होता की त्याने आणि बराक ओबामा यांनी 1999 मध्ये दोनदा सेक्स केला होता. मात्र सिंक्लेअरच्या दाव्यात किती तथ्य आहे हे माहित नाही. कारण सिंक्लेअर हा अशी विचित्र विधाने करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यावर विविध प्रकारची फसवणूक आणि गैरप्रकार केल्याचाही आरोप आहे. यापूर्वी 2008 मध्ये ओबामा अध्यक्षपदासाठी उभे असताना लॅरी सिंक्लेअर याने नॅशनल प्रेस क्लबमध्ये भाषण दिले होते. तिथेही त्याने बराक ओबामा यांच्याशी संबंध असल्याचा दावा केला होता.