Bangladesh Internet Ban lifted: बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणावरून हिंसाचार, 10 दिवसानंतर प्रभावित भागात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत
हिंसाचारग्रस्त बांग्लामध्ये रविवारी १० दिवसांनंतर मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीतील सुधारणांवरून देशात हिंसाचार होत असताना सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी मोबाइल इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली होती.
Bangladesh Internet Ban lifted: हिंसाचारग्रस्त बांग्लामध्ये रविवारी १० दिवसांनंतर मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण प्रणालीतील सुधारणांवरून देशात हिंसाचार होत असताना सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी मोबाइल इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली होती. 'ढाका ट्रिब्यून'च्या बातमीनुसार, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT) राज्यमंत्री जुनैद अहमद पलक यांनी येथे पत्रकार परिषदेत घोषणा केली की, सेवा पुनर्संचयित केल्यानंतर, सर्व वापरकर्त्यांना तीन दिवसांसाठी 5 GB इंटरनेट मोफत दिले जाईल. .
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत्यूबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पंतप्रधान शेख हसीना यांनी मंगळवारी हिंसाचारानंतर कर्फ्यू आदेश देण्याच्या निर्णयाचा बचाव केला आणि सांगितले की, लोकांच्या जीवनाची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, बुधवारी बांग्लादेशातील परिस्थिती सामान्य झाली.