Avalanche In Nepal: नेपाळमधील माऊंट Manaslu येथे हिमस्खलनात 2 गिर्यारोहकांचा मृत्यू, 12 जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, मनास्लू पर्वताच्या कॅम्प IV च्या अगदी खाली हिमस्खलनामुळे 12 गिर्यारोहक जखमी झाले.

Mt-Everest | (Photo Credits: Pixabay)

Avalanche In Nepal: नेपाळ (Nepal) च्या माऊंट मनास्लू (Mount Manaslu) येथे सोमवारी हिमस्खलनात दोन गिर्यारोहकांचा (Avalanche) मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. सध्या याठिकाणी शोध मोहीमही राबवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मनास्लू पर्वताच्या कॅम्प IV च्या अगदी खाली हिमस्खलनामुळे 12 गिर्यारोहक जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन समिट ट्रेक्स, सातोरी अॅडव्हेंचर, इमॅजिन नेपाळ ट्रेक्स, एलिट एक्स्पिडिशन आणि 8के एक्सपिडिशनचे गिर्यारोहक जखमी झाले आहेत. कॅम्प IV च्या अगदी खाली असलेल्या रस्त्यावर हिमस्खलन झाले.

प्राप्त माहितीनुसार, या महिन्याच्या 28-29 सप्टेंबर रोजी 400 हून अधिक गिर्यारोहक शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. इमॅजिन नेपाळ ट्रेक्सचे दावा शेर्पा यांनी सांगितले की, त्यांच्या संघातील पाच जणांना दुखापत झाली असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सातोरी अॅडव्हेंचरचे ऋषी भंडारी यांनी सांगितले की, त्यांच्या मोहीम पथकातील तीन सदस्य जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शिवाय, 8K मोहिमेतील पेम्बा शेर्पा यांनी सांगितले की, भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर आणि तिचा मार्गदर्शक दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत आणि ते सुरक्षित आहेत. (हेही वाचा - Russia School Shooting: Izhevsk मध्ये शाळेत गोळीबार; 7 जणांचा मृत्यू, 20 जखमी (Watch Video))

मदत आणि बचाव कार्यात अडथळे -

सेव्हन समिट ट्रेक्सचे थानेश्वर गुरगाई यांनी सांगितले की, मोहीम संघातील दोन गिर्यारोहकांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. सिम्रिक एअर, कैलाश एअर आणि हेली एव्हरेस्ट यांच्याकडून हवाई शोध सुरू आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif