Man Rescued Naked: पॅसिफिक महासागर एकट्याने ओलांडताना स्वनिर्मित बोट उलटली, Dehydrated तरुण 14 तासांनी नग्नावस्थेत सापडला

एकट्याने प्रवास करत पॅसिफीक महासागर (Pacific Ocean) पार करण्याचा विक्रम मोडीत काढण्याच्या नादात अघोरी धाडस करणाऱ्या 24 ऑस्ट्रेलियन वर्षीय तरुणाची सुटका करण्यात आली आहे. हा तरुण स्वनिर्मीत बोटीने समुद्रात प्रवास करत होता.

Boat Collapse In Sea | (Photo Credits: Twitter/ANI)

एकट्याने प्रवास करत पॅसिफीक महासागर (Pacific Ocean) पार करण्याचा विक्रम मोडीत काढण्याच्या नादात अघोरी धाडस करणाऱ्या 24 ऑस्ट्रेलियन वर्षीय तरुणाची सुटका करण्यात आली आहे. हा तरुण स्वनिर्मीत बोटीने समुद्रात प्रवास करत होता. दरम्यान, त्याची बोट उलटली. त्याची बोट पाण्यात बुडाली नाही. मात्र, दिशाहीन भरकटत राहील. तरुणही बोटीला धरुन कसाबसा चिटकून राहिला. अखेर शरीरातील पाण्याची पातळी खालावलेल्या आणि नग्नावस्थेत (Australian Dehydrated Man Found Naked) असलेल्या या तरुणाला वाचविण्यात यश आले आहे, असे वृत्त पीपल मॅगझीनने दिले आहे. टॉम रॉबिन्सन वानुआटू असे याचे नाव आहे. समुद्री प्रवास करताना एका लाटेचा सामना करताना त्याची बोट उलटली. जगातील सर्वात विस्तीर्ण समुद्र ओलांडत असताना त्याच्यासोबत ही घटना घडली.

वृत्तानुसार, टॉम रॉबिन्सन याने आपला 15 महिन्यांचा, 9,782 मैलांचा ट्रेक संपवला. दरम्यान, त्याची बोट उलटल्यानंतर गुरुवारी रात्री त्याने समस्येत असल्याचा संदेश पाठवला. हा संदेश मिळताच 6 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी एका क्रूझ जहाजाने त्याची सुटका केली. तरुणाने माहिती देताना सांगितले की, त्याच्या बोटीच्या कोबीनचे हॉच उघडे होते. इतक्यात एक मोठी वेगवान लाट आली आणि थेट बोटीतच शीरली. बोटीतून बाहेर पडण्याखेरीज मला दुसरा कोणताच पर्याय नव्हता. लाट आली तेव्हा बोटीत मी नग्नच होतो. कारण वातावरणातील दमटपणा आणि उष्णता यापासून दिलासा मिळावा यासाठी सहसा बोटीमध्ये मी नग्नच असायचो. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मी बाहेर पडलो तेव्हा नग्नच होतो.

थरारक अनुभवाबद्दल बोलतान तरुणाने पुढे सांगितले की, केवळ प्रचंड आत्मबळावरच मी तग धरुन होतो. जीवन हे अतियशय सुंदर आहे. समुद्र प्रवासात मला जाणवले की, पाणी प्रचंड थंड आहे. केवळ प्रियजनांना भेटण्याची आस आणि मनातील आत्मविश्वास याच्याच जोरावर मी जीवंत राहू शकलो. कारण, बोटीवर सतत लाटा आदळत होत्या. कोणत्याही क्षणी एखादी लाट आपल्याला कवेत घेऊन जलसमादी देईल असे मला अनेकदा वाटून गेले.

तरुणाने आपल्या बोटीवरुन पाठवलेला संदेश फ्रेंच नौदलाला मिळाला. तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, तो आगोदरच ऑस्ट्रेलियन सागरी सुरक्षा प्राधिकरणाला मिळाला होता. त्यामुळे P&O च्या पॅसिफिक एक्सप्लोररशी संपर्क साधला गेला. ऑकलंडहून नऊ दिवसांच्या राउंडट्रिप प्रवासात 2,000 पाहुण्यांना घेऊन जाणारे क्रूझ जहाजाला संदेश मिळाला. त्यांनी रॉबिन्सनला वाचवण्यासाठी जहाजाने 124 मैलांचा वळसा घेतला. ते जेव्हा या तरुणाजवळ पोहोचले होते तेव्हा त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी पूर्ण खालावली होती आणि तळपत्या उन्हाने त्याच्या शरीराची त्वचा करपत होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement