Pakistan: बलुचिस्तानमध्ये चिनी कामगारांवर हल्ला, 13 जण ठार; BLA ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

रुग्णालय आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक जण ठार आणि जखमी झाले आहेत.

Attack on Chinese workers in Balochistan (PC - Twitter/@TBPEnglish)

Pakistan: पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) मध्ये झालेल्या हल्ल्यात चार चिनी नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या नऊ जवानांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या आत्मघाती पथक मजीद ब्रिगेडने ग्वादरमध्ये चिनी कामगारांवर आजच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीएलएचे म्हणणे आहे की, त्यांच्या दोन माजीद ब्रिगेडच्या 'फिदाईन'ने हल्ल्यात भाग घेतला होता.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दोन कथित हल्लेखोरांची छायाचित्रे जारी केली आहेत. रुग्णालय आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक जण ठार आणि जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्वादर बंदरात स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकू आला. येथील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर घडली. (हेही वाचा - Pakistan: 'या' 11 लोकांना टीव्हीवर दाखवल्यास वृत्तसंस्थांवर होणार कडक कारवाई; पाकिस्तान सरकारचा TV वाहिन्यांना कडक इशारा)

सरकारी अधिकाऱ्यांनीही ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वादरच्या फकीर कॉलनीजवळ चिनी अभियंत्यांवर हल्ला करण्यात आला. चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरूच आहे. बंदर चारही बाजूंनी वेढलेले आहे. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानमधील चिनी वाणिज्य दूतावासांनी बलुचिस्तान आणि सिंधमधील त्यांच्या नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांवर हल्ले होत असताना हे वक्तव्य आले आहे.