IPL Auction 2025 Live

Atlantic City: डायनामाइटच्या मदतीने पाडले गेले डोनाल्ड ट्रंप यांचे 34 मजली Trump Plaza Hotel; कॅसिनो पाडताना बघण्यासाठी लोकांनी मोजले 40 हजार रुपये (Watch Video)

भव्य 34 मजली इमारत कोसळण्यास 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागला. बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास इमारतीत सलग अनेक स्फोट झाले आणि संपूर्ण इमारती कोसळली.

Trump Plaza (संग्रहित संपादित प्रतिमा)

एक काळ होता जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची 'शानोशौकत’ चर्चेचा विषय होती. ट्रम्पचे कॅसिनो साम्राज्य अटलांटिक सिटीपासून (Atlantic City) सुरू झाले, ज्याला अमेरिकेची 'रिच लँड' म्हटले जाते. याच ठिकाणी उभी होती ट्रंप यांच्या ऐशोआरामाची सख देणारी इमारत ‘ट्रंप प्लाझा हॉटेल’ (Trump Plaza Hotel). पण 1990 च्या दशकात दिवाळखोरीचे युग चालू झाले, त्यातून ट्रम्प यांचे हे साम्राज्य पुन्हा सावरू शकले नाही. आता बुधवारी अटलांटिक शहरातील प्रसिद्ध ट्रम्प प्लाझा हॉटेल व कॅसिनो जमीनदोस्त केला गेला. यासह न्यू जर्सीच्या किनारपट्टीवरील हा 40 वर्षांचा प्रवासही संपुष्टात आला. 3000 डायनामाइटच्या मदतीने ही 34 मजली इमारत पडली गेली. हे दृश्य पाहण्यासाठी खास बंदोबस्त केला गेला होता. हा कॅसिनो पडताना बघण्यासाठी लोकांनी 40 हजार रुपयांपर्यंत किंमत मोजली आहे.

ट्रम्प प्लाझा, अटलांटिक शहरातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध इमारतींपैकी एक  असलेली ही इमारत कोसळण्याकडे ट्रम्प यांचा प्रभाव संपुष्टात येण्याचे चिन्ह म्हणून राजकीय विश्लेषक पाहत आहेत. हा प्लाझा 1984 मध्ये सुरु झाला होता आणि तो 2014 मध्ये बंद झाला. बर्‍याच वादळांमुळे या इमारतीचा बाह्य भाग जीर्ण झाला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये शहराचे महापौर मार्टी स्मॉलने यांनी ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. जेव्हा ही इमारत भुईसपाट केली जात होती, तेव्हा फक्त तेथे शेकडो लोकच उपस्थित नव्हते तर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले गेले.

हा प्लाझा पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. भव्य 34 मजली इमारत कोसळण्यास 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागला. बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास इमारतीत सलग अनेक स्फोट झाले आणि संपूर्ण इमारती कोसळली. अटलांटिक सिटीचे महापौर सांगतात की, इमारत कोसळल्यानंतर त्याचे ढिगारा केवळ 8 मजली उंच आहे आणि तो साफ करण्यासाठी जूनपर्यंतचा कालावधी लागेल. या इमारतीची अंदाजे किंमत 21 दशलक्ष डॉलर्स होती. 60 हजार चौरस फूट जागेतील या इमारतीत 600 हॉटेल खोल्या तसेच भव्य कॅसिनो होते.

ट्रम्प स्वत: हॉलिवूड चित्रपटांमध्ये यापूर्वी दिसले आहेत. त्यांचा प्लाझादेखील एका प्रसिद्ध चित्रपटाचा एक भाग झाला आहे. ट्रम्प प्लाझा चित्रपट ओशन 11 मध्ये दिसला होता. या चित्रपटात ब्रॅड पिट, जॉर्ज क्लूनी, ज्युलिया रॉबर्ट्स, मॅट डॅमॉन आणि केसी एफ्लेक सारख्या कलाकारांची भूमिका होती.

1984 ते 1991 या कालावधीत या कॅसिनोचे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम पाहणारे बर्न डिलन म्हणतात, ‘ट्रम्प प्लाझा आणि अटलांटिक सिटीला ज्या प्रकारे संपूर्ण जगासमोर ठेवले गेले ते अविश्वसनीय होते.’ विशेष म्हणजे पॉप सुपरस्टार मॅडोनापासून ते कुस्तीगीर हल्क होगन, संगीत दिग्गज कीथ रिचर्ड्स आणि सुपरस्टार अभिनेता जॅक निकल्सन या लोकांनीही या प्लाझामध्ये हजेरी लावली आहे.