Tokyo Olympics 2021 : टोकियो ऑलंपिकवर कोरोनाचे सावट, 2 खेळाडूंचा अहवाल आला पॉझिटिव्ह
यातच टोकियो ऑलंपिक 2021 ची घोषणा केली आहे. यावरही कोरोनाचे सावट असून 2 खेळाडू कोरोना संक्रमित झाले आहेत.
जपानची (Japan) राजधानी टोकियोमध्ये (Tokyo) होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा (olympic) स्पर्धेवर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फरक पडत आहे. या खेळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुतो यांनी शनिवारी सांगितले आहे की, कोरोना संसर्गाची पहिली घटना शनिवारी अॅथलीटच्या ठिकाणी झाली होती. मात्र आता खेळांमध्ये भाग घेण्यासाठी गेलेले दोन अॅथलिट्सही (Athletes) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे आढळल्याचे दिसून आले आहे. अशी एएफपीच्या (AFP) अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यानुसार, कोविड पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर ऑलिम्पिक खेड्यात राहणाऱ्या या दोन्ही अॅथलिट्सना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ऑलंपिक खेळांच्या आयोजकांनी 8 जुलैला याबाबत अधिक माहिती दिली आहे.
जपानी राजधानी टोकियोमध्ये कोरोना व्हायरस साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे प्रेक्षकांना टोकियोमध्ये असलेल्या अॅथलिट ठिकाणी तसेच आसपासच्या तीन प्रदेशांमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. परिस्थिती आणखी बिघडल्यामुळे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. असा निर्णय फुकुशिमा प्रांत सरकारने दोन दिवसांनी अझुमा बेसबॉल स्टेडियमसाठी घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाख यांनी शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये अँटि-कोरोनाव्हायरस उपायांवरील वाढती चिंता संपविण्याची मागणी केली. आतापर्यंत एकूण ऑलिंपिक खेळांशी संबंधित परदेशी खेळाडूंमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 15 खेळाडूंची नोंद करण्यात आली आहेत. बाख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले, 1 जुलैपासून सुमारे 15,000 अॅथलिट, अधिकारी आणि ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकशी संबंधित इतर टोकियो येथे दाखल झाले आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये केवळ 15 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. ही आकडेवारी अगदी कमी आहे. याची सरासरी सुमारे 0.1 टक्के एवढी आहे. संक्रमित लोकांना त्वरित विलगीकरणासाठी पाठवण्यात आले आहे. जेणेकरून त्यांचा इतर सहभागी आणि जपानमधील लोकांना कोणताही धोका होणार नाही. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. याचा पार्दुभाव अनेक घटकांवर होत असताना दिसत आहे.