Apple Store Mass Loot in Philadelphia: फिलाडेल्फीया येथील अॅपल स्टोअरमध्ये सामूहिक लूट, iPhones, iPads लांबवले, 100 जणांना अटक (Watch Video)

फिलाडेल्पीया (Philadelphia) येथील अॅपल मोबाईल शोरूम (Apple Mobile Showrooms) आणि शहरातील इतरही काही दुकांनामध्ये किशोरवईन मुलांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट (Apple Store Mass Loot) केल्याचे वृत्त आहे.

Apple Store Mass Loot | (Photo Credit - X)

फिलाडेल्पीया (Philadelphia) येथील अॅपल मोबाईल शोरूम (Apple Mobile Showrooms) आणि शहरातील इतरही काही दुकांनामध्ये किशोरवईन मुलांनी मोठ्या प्रमाणावर लुटालूट (Apple Store Mass Loot) केल्याचे वृत्त आहे. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धक्कादायक म्हणजे फिलाडेल्फीयाच्या मध्यवर्थी भागात ही घटना घडली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, किशोरवयीन मुले दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक वस्तू प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरुन घेऊन जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले सर्व लोक संशयीत आणि काही घटनेचे साक्षीदार (प्रत्यक्षदर्शी) आहेत.

प्राप्त माहितीनुसार, काही तरुण रात्री आठच्या सुमारास अॅपल स्टोअरमध्ये घुसले. त्यांनी स्टोअरमधील किमती आयफोन मोठ्या प्रमाणावर सोबत घेऊन पोबारा केला. पोलिसांना या घटनेची माहिती तातडीने देण्यात आली. पोलिसही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र, तोवर काही तरुणांनी आयफोन घेऊन पोबारा केला होता. काही पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी काहींना पाटलाग करुन ताब्यात घेतले. त्यांतील काहींकडून आयफोन आणि आयपॅडचे ढीगच हस्तगत करण्यात आले. यातील काहींनी पोलिसांच्या भीतीने आयफोन आणि चोरलेला माल जागीच सोडून पोबारा केला होता. पोलिसांचा हवाला देत NBC10 फिलाडेल्फियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यातील 100 पेक्षा अधिक आरोपी हे किशोरवयीन आहेत. त्यांनी लुलुलेमन स्टोअर लुटले आहे.

व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, चेहऱ्यावर बुरखा, मास्क आणि इतर काही मुखवटे लावून आलेल्या काही लोकांनी स्टोअरमध्ये प्रवेश केला. त्यांनी हाताला लागेल त्या वस्तू घेतल्या आणि मिळेल त्या मार्गाने पोबारा केला. यात मोठ्या प्रमाणावर आयफोन, आयपॅड आणि अशाच महागड्या वस्तुंचा समावेश आहे. जवळपास 100 हून अधिक किशोरवयीन तरुणांनी लुलुमेनन स्टोअरवर एक प्रकारे जबरी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, काहींनी सुरक्षा रक्षकांना मारहाण करत भीती दाखवली. दरम्यान, त्याच दिवशी परिसरात आणखी काही चोरीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे दुकानदारांनी दुसऱ्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.