Hybrid Work Model: हायब्रिड वर्क मॉडेल प्रणालीमुळे अॅपल व्यवस्थापन चिंतेत- अहवाल
कंनी व्यवस्थापनाने केलेल्या अंतर्गत मुल्यमापन आणि सर्व्हेमध्ये पुढे आले की, जवळपास 90% कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केले की ते लवचिक ठिकाणानुसार (Flexible Location) काम करण्यास अधिक उत्सुक आहेत.
अॅपल (Apple) कंपनीचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानंतर कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्शनमधून पुढे आले आहे की, कर्मचारी 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) प्रणालीत स्वत:ला अधिक आरामदायक समजतात. कंनी व्यवस्थापनाने केलेल्या अंतर्गत मुल्यमापन आणि सर्व्हेमध्ये पुढे आले की, जवळपास 90% कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केले की ते लवचिक ठिकाणानुसार (Flexible Location) काम करण्यास अधिक उत्सुक आहेत. जवळपास सर्वच कर्मचारी तसे मत व्यक्त करताना दिसले.
कर्मचाऱ्यांनी फिलेक्सिबल लोकेशनसोबत अनिश्चित काळापर्यंत घरुन काम करण्याचे मत व्यक्त केले. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 1,743 कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अतर्गत सर्वेक्शनात उत्तर दिले की ते फिलेक्सिबल लोकेशनसोबत काम करु इच्छितात. एका अहवालात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी 14 जूनला टॉम कूक आणि डिएट्रे ओ ब्रायन , खुदरा आणि इतर वरिष्ठ उपध्यक्षांना सर्वेक्शनाचा अहवाल पाठवला. (हेही वाचा, Work From Home: 'वर्क फ्रॉम होम' दरम्यान जगभरात हॅकींगच्या प्रमाणात वाढ)
अॅपलने जागतिक पातळीवर आपले मुख्यालय आणि इतर कार्यालये पुन्हा सुरु केली आहेत. कुक यांनी पाठिमागच्या महिन्यात म्हटले होते की, मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी सोमवार, मंगळवार आणि गुरुवार आदि दिवशी कार्यालयात उपस्थि राहण्यास सांगितले जाईल. ज्यात बुधवार आणि शुक्रवारी घरुन काम करण्याचा पर्याय उपलब्ध असेन.
अॅपलच्या कर्मचाऱ्यांजवळ पाच वर्षांपैकी दोन आठवड्यांपर्यंत घरुन काम करण्याचीही संधी आहे. ते आपले कुटुंबीय आणि आप्तेंष्टांसोबत राहून आणि काम करताना काही बदल, प्रवास आदींदरम्यान वर्क फ्रॉम होम करु शकतात.