मसाज (Massage) करुन घेण्यासाठी मसाज पार्लरमध्ये (Massage Parlour) गेलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला सेक्स (Sex) करण्यास नकार दिल्याने पार्लरमधील महिला आणि पुरुषांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या हाणामारीत तरुणाच्या शरीराती काही हाडेही मोडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. यात 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. ही घटना दुबई येथील एका पार्लरमध्ये घडली.
प्राप्त माहितीनुसार, हे आरोपी मसाज पार्लरच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होते. या प्रकाराची ग्राहक म्हणून मसाज पार्लरमध्ये आलेल्या तरुणाला माहिती नव्हती. मसाज करुन घेण्याच्या उद्देशाने पार्लरमध्ये आलेल्या तरुणाने शुल्कापोटी काउंटरवर 400 दिरहम जमा केले. तरुण मसाज रुममध्ये गेला. त्याने कपडे काढले. परंतू, तिथे असलेल्या कर्मचारी असलेल्या तरुणीने त्याला टॉवेलही दिला नाही. त्या तरुणाला या प्रकाराचे प्रचंड आश्चर्य वाटले. तरुणाने कर्मचारी असलेल्या त्या तरुणीकडे विचारणा केली असता तरुणीने त्याला भलतीच ऑफर दिली. त्या तरुणीने त्या तरुणाला चक्क सेक्स करण्याची ऑफर दिली.
मसाज करण्याच्या उद्देशाने आलेल्या त्या तरुणाला थेट सेक्स करण्याची ऑफर आल्यावर तो गोंधळून गेला. त्याने सेक्स करण्यास नकार दिला. तसेच काऊंटरवर जमा केलेले 400 दिरहम परत मागत कपडे घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्या तरुणीने सेक्स कर तुझे पैसै परत मिळणार नाहीत असे सांगितले. गोंधळून गेलेल्या तरुणाने कसेबसे कपडे अंगावर चढवले आणि तो काऊंटरवर (जिथे पैसे जमा केले होते) तक्रार करण्यासाठी जाऊ लागला. दरम्यान, तरुणीने सेक्स करण्यासाठी आग्रह धर त्याला मारहाण सुरु केली. दरम्यान तिथे आणखी एक महिला आली तिनेही या तरुणास मारहाण करायला सुरुवात केली. इतक्यात आणखी एका पुरुषाने या तरुणाला पाठिमागच्या बाजूने डोक्यात काहीतरी जड वस्तू मारली. (हेही वाचा, गुजरात: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याकडून बायकोला मारहाण)
दरम्यान, पीडित तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्याने आफले 400 दिरहम परत मिळावे आणि दोषींवर कारवाई व्हावी असे म्हटले आहे. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांना गुन्हा नोंदवून अटक केली आहे. या चौघांवर देहविक्री करणे, मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणे, नागरिकांची फसवणूक करणे असे आरोप आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन पुरुष आहेत. त्यांचे वय अनुक्रमे 18 आणि 39 आहे. तर, दोन महिलांचे वय अनुक्रमे 33 आणि 35 वर्षे आहे.