अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्प ने पंतप्रधान मोदींच्या विजयावर केला शुभेच्छांचा वर्षाव, प्रधानमंत्रींना ट्विटरद्वारे दिला खास शुभेच्छा संदेश
डॉनल्ड ट्रम्प यांनी मोदींना ट्विटरद्वारे खास शुभेच्छा संदेश दिला.
Lok Sabha Elections Results 2019: देशाच्या 17 व्या लोकसभा निवडणूकीचे निकाल संपुर्ण भारताला खूपच आश्चर्याच्या धक्का देणारे होते. विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांचा, व्हिडियोंच्या मोदीच्या विजयावर काहीच परिणाम झाला नसून मोदींनी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवला असून पंतप्रधान पदावर आपलं नावं कोरलं आहे. त्यामुळे निकालाचे अंतिम परिणाम हाती येण्या आधीपासूनच देशविदेशातील दिग्गज नेत्यांनी मोदींवर सोशल मिडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यातच आणखी एक नाव जोडलं गेलय, ते म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्प यांचे. डॉनल्ड ट्रम्प यांनी मोदींना ट्विटरद्वारे खास शुभेच्छा संदेश दिला.
अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्पने दिल्या शुभेच्छा:
डॉनल्ड ट्रम्प यांनी प्रधानमंत्री मोदी आणि भाजपला त्यांच्या या शानदार विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पीएम मोदींचे सरकार परत आल्याने अमेरिकेतील नातेसंबंध अधिक दृढ होतील, आणि अनेक करार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे असेही ते ह्या ट्विटमध्ये म्हणाले.
त्यांच्यासोबतच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान ने पीएम मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच दोन्ही देशांमध्ये शांती टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा पाऊल टाकूया, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपच्या या ऐतिहासिक विजयाची चर्चा अगदी परदेशापर्यंत पोहोचली आहे. इज्राइलचे प्रधानमंत्री बेंजामि नेतन्याहू, जापानचे प्रधानमंत्री शिंजो आबे, चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग, रूसचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, भूटानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी सारख्या दिग्गज नेत्यांनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या.