संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान आणि चीन चा अपमान, धार्मिक अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावर अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटेन ने फटकारले
त्यादरम्यान अमेरिका (America), कॅनडा (Canada) आणि ब्रिटेन (Britain) ने पाकिस्तान आणि चीनला फटकारले.
संयुक्त राष्ट्रात (United Nation) धार्मिक अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावरुन सर्व देशांची महत्त्वाची बैठक सुरु होती. त्यादरम्यान अमेरिका (America), कॅनडा (Canada) आणि ब्रिटेन (Britain) ने पाकिस्तान आणि चीनला फटकारले. या बैठकीत अमेरिकेचे राजदूत एट लार्ज सॅम ब्राउनबॅक यांनी सांगितले की, पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याक भेदभावपूर्ण कायदे आणि प्रथांनी ग्रासलेला आहे. तसेच चीनमध्ये धार्मिक स्वतंत्रता मुद्यावर व्यापक प्रतिबंध वाढवले जात आहे. यामुळे आम्ही फार चिंतेत आहोत त्यामुळे त्या राष्ट्रात सर्व मानवाधिकारांचा आणि स्वतंत्रतेचा सन्मान केला जावा, असा आग्रह सॅम ब्राउनबॅक ने केला आहे.
अमेरिकेपाठोपाठ ब्रिटेन आणि कॅनडा या देशांनी देखील पाक आणि चीनला खडे बोल सुनावले. धार्मिक अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावर या देशात केला जाणारा भेदभाव हा योग्य नसल्याने ब्रिटेन आणि कॅनडा या देशांनी देखील पाकिस्तान आणि चीनला फैलावर घेतले. त्यातच मानवाधिकार कार्यकर्ता नावीद वाल्टर ने सांगितले की पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लोकांमध्ये धर्माच्या आधारावर पक्षपातीपणा केला जातो.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- पाकिस्तान अजून किती धोंडे पाडून घेणार - सामना च्या अग्रलेखातून इमरान खान च्या कश्मीर प्रश्नी घेतलेल्या भूमिकेची उडवली खिल्ली
तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी जगभरातील सर्व देशांमध्ये धार्मिक मतभेद नष्ट करण्याचे अपील केले आहे.
हिंदू अमेरिकी फाउंडेशन ने या वर्षातील जून महिन्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समुदायतील अधिका-यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपुर्ण भूमिका निभावल्यामुळे सॅम ब्राउनबॅक ला बहुलतावादला प्रोत्साहन दिल्यासंबंधी महात्मा गांधी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.