Air India Cancels Flights Due to Bangladesh Violence: हिंसक निदर्शनांदरम्यान एअर इंडियाने रद्द केली ढाक्याला जाणारी सर्व उड्डाणे; हजरत शाहजलाल विमानतळ बंद
एअरलाइन्सच्या या निर्णयानंतर भारतातून ढाक्याला एकही फ्लाइट जाणार नाही आणि ढाकाहून भारतात कोणतीही फ्लाइट येऊ शकणार नाही. याशिवाय, ढाका शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूकही सुरू प्रभावित झाली आहे.
Air India Cancels Flights Due to Bangladesh Violence: बांगलादेशात होत असलेल्या तीव्र निषेधाच्या (Bangladesh Violence) पार्श्वभूमीवर टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) ने ढाक्याला (Dhaka) जाणारी सर्व उड्डाणे (Flights) तत्काळ रद्द केली आहेत. आमच्या प्रवासी आणि चालक दलाची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. बांगलादेशमध्ये सातत्याने होत असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. एअरलाइन्सच्या या निर्णयानंतर भारतातून ढाक्याला एकही फ्लाइट जाणार नाही आणि ढाकाहून भारतात कोणतीही फ्लाइट येऊ शकणार नाही. याशिवाय, ढाका शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूकही सुरू प्रभावित झाली आहे.
दरम्यान, एअर इंडियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'बांगलादेशातील उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता, आम्ही आमच्या ढाका आणि तेथून जाणाऱ्या विमानांचे नियोजित ऑपरेशन त्वरित प्रभावाने रद्द केले आहेत. आम्ही परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहोत आणि आमच्या प्रवाशांना ढाका आणि तेथून पुष्टी केलेल्या बुकिंगसह मदत पुरवत आहोत, ज्यामध्ये रिशिड्यूलिंग आणि कँन्सेलेशन शुल्कावर एकवेळ सुटीचा समावेश आहे. आमचे प्रवासी आणि क्रू यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या 24/7 संपर्क केंद्रावर 011-69329333 / 011-69329999 वर कॉल करा.' (हेही वाचा -Bangladesh Protests: पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत आल्या शेख हसीना; आता लंडनला जाणार)
ढाका विमानतळ बंद -
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पुढील सहा तासांसाठी अधिकाऱ्यांनी हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने एका अधिसूचनेत ही माहिती दिली आहे. (हेही वाचा -Bangladesh PM Sheikh Hasina Resigned: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा राजीनामा, देशही सोडला; मीडियाचा सूत्रांच्या हवाल्याने दावा)
आयएसपीआरने सांगितले की, यावेळी कोणतेही विमान टेक ऑफ किंवा लँडिंग करणार नाही आणि टर्मिनल बंद राहील. तत्पूर्वी, (HSIA) कार्यकारी संचालक कॅप्टन कमरूल इस्लाम यांनी सांगितले की, विमानतळावरील सर्व कामकाज बंद करण्यात आले आहे. विमानतळाबाबत अद्ययावत माहिती नंतर प्रसारमाध्यमांना दिली जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)