Russia Ukraine War: रशियाच्या मोठ्या हवाई हल्ल्यानंतर आता अमेरीका युक्रेनच्या पाठीशी, व्लादिमीर झेलेन्स्की आणि जो बाइडनमध्ये महत्वपूर्ण संवाद
अमेरिका आता युक्रेनला स्टेट्स प्रगत हवाई संरक्षण प्रणाली पुरवणार आहे, असं आश्वासन अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बाइडन यांनी युक्रेनला दिलं आहे.
युक्रेन विरुध्द रशिया युद्धाच्या (Russia Ukraine War) सुरुवातीपासून रशियाने काल युक्रेनमधील (Ukraine) शहरांवर सर्वात मोठे हवाई हल्ले केला आहे. या हल्ल्यात युक्रेनचं आजपर्यतचं सर्वाधिक नुकसान झालं. तरी युक्रेनच्या या भीषण कारवाई नंतर आता युक्रेनने दंड थोपटले असुन आता युक्रेन सशस्त्र कारवाईस सज्ज आहे. काल रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात तब्बल १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असुन अनेक गंभीर जखमी आहे. रशियाकडून (Russia) केला गेलेला हा हल्ला युक्रेनमधील उद्याने (Garden), सार्वजनिक ठिकाणे (Public Places) तसेच पर्यटन स्थळांवर (Tourist Places) केल्यामुळे या हल्ल्यात युक्रेनचं जिवीत तसेच वित्त हानीचं मोठं नुकसानं झालं आहे. पश्चिम युक्रेनमधील कीव (Kyiv), ल्विव्ह (Lviv), टेर्नोपिल-झायटोमिर (Ternopil and Zhytomyr), डनिप्रो-क्रेमेनचुक (Dnipro and Kremenchuk), दक्षिणेकडील झापोरिझ्झिया (Zaporizhzhia) आणि पूर्वेकडील खार्किव (Kharkiv) येथे स्फोट झाल्याची माहिती युक्रेन प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
फेब्रुवारी 24 पासून सुरुवात झालेल्या रशिया युक्रेन युध्दाला (Russia Ukraine War) जवळपास आठ महिने पुर्ण झाले आहेत. तरी युध्द थांबण्याचं तर लांबचं पण हे युध्द अधिकचं तीव्र होत चाल्ल आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) म्हणाले की त्यांनी शनिवारी रशियाला जोडलेल्या क्रिमियाला जोडणार्या पुलावर युक्रेनवर हल्ला केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी "मोठ्या प्रमाणात" लांब पल्ल्याच्या हल्ल्यांचे आदेश दिले. (हे ही वाचा:- Russia-Ukraine War: रशियाने डागली 75 क्षेपणास्त्र, विविध शहरांमध्ये असंख्य नागरिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा)
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रध्य झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांच्याशी टेलिग्रामच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात झेलेन्स्की यांनी नमूद केलं हवाई संरक्षण हे "आमच्या संरक्षण सहकार्यात प्रथम क्रमांकाचे प्राधान्य" किंवा ते मजबूत असणं आमच्यासाठी सर्वाधिक गरजेचं आहे. सशस्त्र दलांना बळकट करण्यासाठी सर्व काही करू. तर बाइडन यांच्या आश्वासनानुसार अमेरिका आता युक्रेनला स्टेट्स प्रगत हवाई संरक्षण प्रणाली पुरवणार आहे. म्हणजे पुढील काळात रशिया विरुध्द युक्रेत हे युध्द आणखीचं मोठं आणि राक्षसी रुप घेवू शकत याची शक्यता नाकारता येणार नाही.