Israel Airstrikes On Hezbollah: लेबनॉनवर गेल्या 24 तासांत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 7 ठार, 65 जखमी
लेबनीज नॅशनल न्यूज एजन्सीने वृत्त दिले की, आक्रमकतेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3,452 जणांचा मृत्यू झाला असून 14,664 जण जखमी झाले आहेत.
Israel Airstrikes On Hezbollah: लेबनॉन (Lebanon) मधील विविध भागात इस्त्रायली हवाई हल्ल्यात (Israel Airstrikes) गेल्या 24 तासांत 7 लोकांचा मृत्यू झाला असून 65 जण जखमी झाले आहेत. यासदंर्भात लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. लेबनीज नॅशनल न्यूज एजन्सीने वृत्त दिले की, आक्रमकतेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3,452 जणांचा मृत्यू झाला असून 14,664 जण जखमी झाले आहेत.
गेल्या 24 तासांत, लेबनॉनच्या विविध क्षेत्रांवर 145 हवाई हल्ले आणि गोळीबार हल्ले नोंदवले गेले, ज्यामुळे आक्रमणाच्या सुरुवातीपासून एकूण हल्ल्यांची संख्या 13,222 झाली आहे. लेबनॉनमध्ये शुक्रवारी इस्रायलच्या हल्ल्यात किमान 11 जण ठार झाले. यामध्ये एका घरात राहणारी आई, वडील आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश होता. तसेच संरक्षण केंद्रात 14 आपत्कालीन कामगार आणि स्वयंसेवक मारले गेले. (हेही वाचा -Israel Attack on Syria: इस्रायलचा सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला; 7 ठार, 20 हून अधिक जखमी)
दरम्यान, इस्त्रायली संरक्षण दलांनी गुरुवारी सांगितले की, आठवडाभर चाललेल्या हवाई हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे 200 सैनिक मारले गेले आणि 140 रॉकेट लाँचर नष्ट केले गेले. हे लाँचर्स सैनिकांसाठी धोका निर्माण करत होते. मृतांमध्ये बटालियन ऑपरेशन प्रमुख आणि हिजबुल्लाहच्या रदवान फोर्समधील अँटी-टँक शस्त्रे बटालियन प्रमुखाचा समावेश आहे. (हेही वाचा - Israeli Airstrikes Target Iran's Missile Production: इराणच्या क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांवर इस्रायली हवाई हल्ले, नव्या उपग्रह छायाचित्रांचा खुलासा)
इस्रायल-हमास युद्धाला सुरुवात -
इस्रायल-हमास युद्धाला सुरुवात झाली जेव्हा पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 1,200 लोक ठार झाले. तसेच अनेकांचे अपहरण करण्यात आले. लेबनॉनच्या हिजबुल्ला गटाने 8 ऑक्टोबर 2023 रोजी गाझामधील हमासशी एकता म्हणून इस्रायलमध्ये गोळीबार करण्यास सुरुवात केली. गाझामध्ये इस्रायलच्या 13 महिन्यांच्या क्रूर युद्धात 43,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यात बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.