धक्कादायक! Energy Drink प्यायल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

16 एप्रिल रोजी Francisco Cervantes आपल्या आजीच्या घरी जात असताना ही दुःखद घटना घडली.

Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

अनियमित जीवनशैली आणि खराब आहारामुळे लोकांचे शरीर अनेक आजारांचे कारण बनत आहे. तसेच यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढत आहे. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हृदयविकाराच्या झटक्याने 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, पण उत्तर-पूर्व मेक्सिकोमध्ये हे घडलं आहे.

द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर-पूर्व मेक्सिकोच्या मॅटामोरोसमध्ये मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक (Monster Energy Drink) चा ग्लास प्यायल्यानंतर एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. 16 एप्रिल रोजी Francisco Cervantes आपल्या आजीच्या घरी जात असताना ही दुःखद घटना घडली. (हेही वाचा - 11 Year Old Boy Hide in Fridge: वादळाचा सामना करण्यासाठी 20 तास फ्रिजमध्ये बसला 11 वर्षाचा मुलगा; पुढे काय घडलं, जाणून घ्या)

एनर्जी ड्रिंक्स पिल्याने बिघडली तब्बेत -

अहवालानुसार, फ्रान्सिस्को सर्व्हेन्टेस (Francisco Cervantes) ने तहान शमवण्यासाठी मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक (एक प्रकारचे एनर्जी ड्रिंक) प्यायले. एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर मुलाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला स्थानिक अल्फ्रेडो पुमरेजो रुग्णालयात (Alfredo Pumarejo Hospital) नेले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांचा मेंदू मृत झाला आहे. त्यानंतर फ्रान्सिस्कोने सहा दिवस कोमात घालवले. कारण त्याची आई जेसिकाने सुरुवातीला त्याला Artificial Life Support Machine मधून काढू दिले नाही.

अहवालानुसार, 6 वर्षीय फ्रान्सिस्को सेर्व्हेंटेस याला आधी कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासले होते की नाही हे कळू शकलेले नाही. तथापि, एनएचएससह विविध आरोग्य तज्ञांनी लहान मुलांना एनर्जी ड्रिंक्सचे सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर मॉन्स्टर एनर्जी ड्रिंककडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.