Israeli Gaza Conflict: पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अगोदरच गाझामध्ये इस्त्रायचा हल्ला, 48 ठार
त्यासाठी ३ दिवस शांतता राखली जाणार होती. मात्र, त्याआधीच गाझामध्ये इस्त्रायने हल्ला केला. यात 48 ठार झाले आहेत.
Israeli Gaza Conflict: डब्ल्यूएचओकडून गाझामध्ये पोलिओ लसीकरण मोहिम (Polio Vaccine Campaign)राबवली जाणार होती. ज्यात 6,40,000 मुलांचे सलीकरण केले जाणार होते. मात्र, लसीकरण सुरू होण्याआधीच इस्त्रायलकडून तेथे हल्ला (Israeli Strikes on Gaza)करण्यात आला. ज्यात 48 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पॅलेस्टाईन आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली. हा हल्ला एन्क्लेव्ह मध्य आणि दक्षिणेकडील भागात झाला. गरम्यान, तीन दिवस युद्ध बंदी घोषित केली असताना असा हल्ला झाल्याने तेथील आरोग्य व्यवल्था आणिखी खालावली आहे.(हेही वाचा:Gaza Polio Vaccinations: गाझामध्ये तीन दिवसांचा युद्धविराम; Israel आणि Hamas यांची सहमती, राबवली जाणार पोलिओ लसीकरण मोहीम- WHO )
काही दिवसांपूर्वी एका बाळाला अंशतः टाइप 2 पोलिओ व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले होते. तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच पोलिओचा रुग्ण आढळला. यामुळे पॅलेस्टिनी भागात लसीकरण मोहीम आज 1 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. त्यामुळे स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत युद्धविराम असणार होता. मात्र, लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी युद्धविरामाला पाठ दाखवत हल्ला झाला. (हेही वाचा:Israeli Gaza War: इस्रायलचा दक्षिण गाझा पट्टीवर हवाई हल्ला, 71 जण ठार; 289 जखमी)
शनिवारी, अधिकृत मोहीम सुरू होण्यापूर्वीच नॅसर हॉस्पिटलच्या वॉर्डमधील काही मुलांना लस दिली गेली होती. तज्ञांच्या मते, मोहीम यशस्वी होण्यासाठी मुलांना चार आठवड्यांत दोनदा लसीकरण करणे आवश्यक आहे. परंतु गाझामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी आव्हाने आहेत. जवळजवळ ११ महिन्यांपासून तेथे युद्ध सुरू आहे. गाझाच्या इतर भागात हल्ल्यांच्या मालिकेत इतर 30 हून अधिक लोक मारले गेले.