Senegal Road Accident: मध्य सेनेगलमध्ये दोन बसमध्ये झालेल्या भीषण धडकेत 40 जण ठार; तर 78 हून अधिक जखमी
या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
Senegal Road Accident: रविवारी मध्य सेनेगल (Senegal) मध्ये एक भीषण रस्ता अपघात (Accident) झाला. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 78 जण जखमी झाले आहेत. मध्य सेनेगलमध्ये दोन बस समोरासमोर धडकल्या. त्यामुळे दोन्ही बसमधील किमान 40 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रपती मॅकी सॅल यांनी सांगितले की, काफरिन भागातील गनीबी गावात पहाटे 3.30 वाजता हा अपघात झाला. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
राष्ट्रपती मॅकी सॅल यांनी सांगितले की, आज गनीबी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातामुळे मला खूप दु:ख झाले आहे. या अपघातात 40 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मी पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. (हेही वाचा-Palghar Accident: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार आणि ट्रकची जोरदार धडक; 3 जणांचा मृत्यू)
राष्ट्रपतींनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात राष्ट्रीय मार्ग क्रमांक-1 वर झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, टायर पंक्चर झाल्यामुळे सार्वजनिक बस दुसऱ्या बसला धडकली. त्यामुळे बस उलटली. या अपघातात 78 जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
खराब रस्ते, खराब कार आणि चालक नियमांचे पालन न केल्यामुळे पश्चिम आफ्रिकन देशात अपघात नियमितपणे होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 2017 मध्ये दोन बसच्या अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू झाला होता.