धक्कादायक! लंडन येथे ट्रक कन्टेनरमध्ये सापडले 39 मृतदेह

या घटनेमुळे संपूर्ण लंडन शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लंडनमधील औद्योगिक वसाहतीत बुधवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

39 Bodies Found In London (Photo Credit - File Photo)

लंडनमध्ये (London) एका ट्रक कन्टेनरमध्ये (Truck Container) 39 जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे संपूर्ण लंडन शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लंडनमधील औद्योगिक वसाहतीत बुधवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लंडन पोलिसांनी संबंधित ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. हा ट्रक बल्गेरियातून वेल्समधील हॉलिहेड येथे शनिवारी दाखल झाला आसावा, असा प्राथमिक अंदाज मुख्य पोलीस अधीक्षक अॅन्ड्र्यू मरिनर यांनी व्यक्त केला आहे.  (नवी मुंबई: दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेत परिक्षेदरम्यान दुर्दैवी मृत्यू)

एएनआय ट्विट -

सध्या ट्रकमधील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

नाशिक: भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची धडक लागून बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू

दरम्यान, संबंधित ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. मध्य लंडनपासून 20 माईल्स अंतरावर असलेल्या थेम्स नदीजवळील ग्रेजच्या ‘वॉटरग्लेड’ या औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका ट्रकच्या कंटेनरमध्ये हे मृतदेह आढळून आले. या मृतदेहांपैकी 38 मृतदेह हे प्रौढ व्यक्तींचे असून 1 मृतदेह अल्पवयीन व्यक्तीचा आहे, अशी माहिती लंडनमधील आपत्कालीन दलाने दिली आहे.