Nigeria Bus Accident: नायजेरीयात तीन बसचा विचित्र अपघात, दुर्घटनेत तब्बल ३७ जणांचा मृत्यू

यात दोन नाही तर तीन बस एकमेकांवर येवून आदळल्या आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की यांत तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

आफ्रिकेत (Africa) कायमच रस्ते अपघाताच्या (Road Accident) दुर्घटना कानावर पडतात. त्यातही नायजेरीया (Nigeria) ह्याला तर अपघातग्रस्त भाग म्हण्टलं तर वावग ठरणार नाही. कारण खराब रस्त्यांमुळे येथे कायमचं अपघात होताना दिसतात. तरी काल नायजेरीच्या मैदुगुरी भागात एक विचित्र अपघात घडला आहे. यात दोन नाही तर तीन बस एकमेकांवर येवून आदळल्या आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की यांत तब्बल 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी बसच्या अतीवेगामुळे हा अपघात झाल्याची माहिती पुढे येत आहे. दोन वेगवान बसेस ऐकमेकांच्या विरुध्द दिशेने येत होत्या. तरी एका बसचा अचानक टायर फुटल्याने बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती बस पुढून येणाऱ्या बसवर जावून धडकली. या दोन्ही बसची धडक एवढी भीषण होती की या दोन्ही बसने पेट घेतला आणि बघता बघता बसेस जळून खाक झाल्या.

 

तेवढ्यात रस्त्यावर अचानक घडलेल्या या अपघाताची काहीही माहिती नसता मागून येणाऱ्या बस चालकाचं देखील नियंत्रण सुटलं आणि ती तिसरी बस देखील या दोन बसवर येवून आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की तिन्ही बसमधील एकूण 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर अनेक प्रवाशी या अपघातात गंभीर जखमी आहेत. (हे ही वाचा:- Plane Force Landing: पुढील गिअरविना विमानाचं विमानतळावर लॅंडींग, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ)

 

यापूर्वी देखील नायजेरीयातून (Nigeria) विविध भीषण अपघाताच्या बातम्या पुढे येताना दिसतात. या अपघाता दरम्यान अनेक निष्पापांचा बळी जातो. तरी रस्ते सुविधा, गाड्यांचा  वेग यावर नायजेरीयन प्रशासन कधी काम करेल हे बघण महत्वाचं ठरणार आहे. नायजेरिया (Nigeria) हा भाग अपघातांमुळे सध्या मृत्यूचा सापळा बनत आहे. लोकांमध्ये रस्ते प्रवाबाबत भितीचं वातावरण आहे. तरी तीन बसच्या झालेल्या या भीषण अपघातात गंभीर जखमी अपघात ग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.