Coronavirus (Photo Credits: File Image)

‘कोरोना’ आजाराने सध्या चीनपाठोपाठच इतर देशांमध्येही थैमान घातले आहे. अनेक लोक या आजारामुळे आपले प्राण गांवात आहेत. भारतातही या आजाराचे काही संशयित रुग्ण आढळले आहेत. पण त्याहीपेक्षा या आजाराचा मोठा धक्का बसला आहे चीनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना. भारतातील एकूण 27 विद्यार्थी चीनमधील एका विद्यापीठात मागील काही दिवसांपासून अडकून पडले आहेत. यात महाराष्ट्रातील एकूण सात विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समजते आहे.

हे सर्व विद्यार्थी चीनमधील हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सियानिग गावातील ‘हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी’ मध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. मुख्य म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, गडचिरोली, यवतमाळ आणि नांदेड मधील काही जण आहेत.

हुबे विद्यापीठ असणाऱ्या सियानिग गावातील काही नागरिकांना 'कोरोना' या रोगाची लागण झाली आहे आणि म्हणूनच गेल्या आठवड्याभरापासून विद्यापीठातील सर्वच भारतीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

पहा कोण आहेत महाराष्ट्रातील हे 7 विद्यार्थी

1. सलोनी त्रिभुवन, पुणे

2. जयदीप देवकाते, पिंपरी चिंचवड, पुणे

3. कोमल जल्देवार, नांदेड

4. प्राची भालेराव, यवतमाळ

5. भाग्यश्री उके, भद्रावती, चंद्रपूर

6. सोनाली भोयर, गडचिरोली

7. आशिष गुरमे, लातूर

Coronavirus ची लागण चीन पाठोपाठ जपान आणि अमेरिका पर्यंत पोहचली; जाणून या आजारा विषयी खास माहिती

दरम्यान, जवळपास आठवड्याभरापासून विद्यापीठाच्या आवारात अडकून पडल्यामुळे, विद्यार्थ्यांकडील जेवणाचं साहित्य आता संपत आलेलं आहे असं त्यांनी आपल्या पालकांना फोनद्वारे संपर्क करून सांगितले आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी चीनमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे व मदत मागितली आहे.