Woman Hired to Watch Porn: ऐकावे ते नवलचं! 22 वर्षीय महिलेला पूर्णवेळ पॉर्न पाहण्यासाठी मिळतात पैसे; म्हणाली, 'ही जगातील सर्वोत्तम नोकरी', जाणून घ्या नेमकी काय आहे प्रकरण

नोकरीमध्ये लैंगिक पोझिशन्स, कालावधी, कामोत्तेजनाची संख्या, पुरुष विरुद्ध महिला गुणोत्तर, केसांचा रंग वितरण आणि भाषा वितरण यासारख्या गोष्टींवर माहिती गोळा करायची आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

Woman Hired to Watch Porn: स्कॉटलंडमधील एका 22 वर्षीय महिलेची 90,000 अर्जदारांपैकी पॉर्न पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. ग्रीनॉकमधील रेबेका डिक्सन (Rebecca Dickso) ला बेडबिबलच्या पॉर्न रिसर्चचे प्रमुख म्हणून 90,000 हून अधिक लोकांमधून निवडले गेले. बेडबिबलने सांगितले की, पॉर्न पाहण्यासाठी पैसे मिळणाऱ्या व्यक्तीला घेऊन पोर्न इंडस्ट्रीची चांगली माहिती मिळवायची आहे. नोकरीमध्ये लैंगिक पोझिशन्स, कालावधी, कामोत्तेजनाची संख्या, पुरुष विरुद्ध महिला गुणोत्तर, केसांचा रंग वितरण आणि भाषा वितरण यासारख्या गोष्टींवर माहिती गोळा करायची आहे.

यासंदर्भात बोलताना रेबेका म्हणाली, ''मी यासंदर्बातील जाहिरात पाहिली आणि मला वाटले की, हे फक्त एक आदर्श काम आहे. पॉर्न पाहण्यासाठी पैसे मिळणार? हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. यासाठी माझी निवड करण्यात आल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, मी एका छोट्या शहरातून आहे. जिथे असं फार काही घडत नाही. त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे आणि मला या प्रकल्पाचा एक भाग असल्याचा आनंद होत आहे.'' (हेही वाचा - Sexual Problem: श्वासाची दुर्गंधी असलेल्या पुरुषांमध्ये उद्भवू शकते Erectile Dysfunction ची समस्या; अभ्यासात खुलासा)

बेडबिबलचे सह-संस्थापक जेकब बेगर म्हणाले की, “रेबेका ही आमच्यासाठी नैसर्गिक निवड आहे. ती खुल्या मनाची आहे आणि जगातील पहिल्या सखोल पॉर्न आकडेवारीचा एक भाग बनण्यास प्रवृत्त आहे. तिने तिच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे तिला उद्यम करणे आणि या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या विविध श्रेणी शोधणे आवडते."

याशिवाय, रेबेकाने या कामासाठी अर्ज का केला याचे उत्तर देताना सांगितले की, तिला असे वाटते की हे आदर्श काम आहे. हे असे विधान आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. हे संपूर्ण बेडबिबल संस्थेचे वैशिष्ट्य आहे. आम्ही फक्त अशा लोकांसोबत काम करतो जे या विषयाबद्दल 100% उत्कट आहेत, असंही बेडबिबलचे सह-संस्थापक जेकब बेगर यांनी सांगितलं आहे.