Two Supreme Court Judges Shot Dead In Iran: इराणमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या; हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:लाही संपवले

सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएने वृत्त दिले आहे की, न्यायाधीश मौलवी मोहम्मद मोगीसेह आणि न्यायाधीश अली रजनी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. 'IRNA' नुसार, या हल्ल्यात एका न्यायाधीशाचा अंगरक्षकही जखमी झाला आहे.

Firing | (Photo Credits: Pixabay)

Two Supreme Court Judges Shot Dead In Iran: इराणची राजधानी तेहरान (Tehran) मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या (Two Supreme Court Judges Shot Dead) करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, एका व्यक्तीने दोन प्रमुख कट्टरपंथी न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या (Murder) केली. देशातील न्यायव्यवस्थेवर झालेला हा एक दुर्मिळ हल्ला आहे.

हल्लेखोराने हल्ल्यानंतर केली आत्महत्या -

सरकारी वृत्तसंस्था आयआरएनएने वृत्त दिले आहे की, न्यायाधीश मौलवी मोहम्मद मोगीसेह आणि न्यायाधीश अली रजनी यांचा गोळीबारात मृत्यू झाला. 'IRNA' नुसार, या हल्ल्यात एका न्यायाधीशाचा अंगरक्षकही जखमी झाला आहे. वृत्तानुसार, हल्लेखोराने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. (हेही वाचा -Iran Holds Back Hijab Law: आंदोलन करणाऱ्या महिलांसमोर झुकले इराण सरकार; हिजाबशी संबंधित वादग्रस्त कायदा घेतला मागे)

हत्येचा हेतू अद्याप स्पष्ट नसला तरी, न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते असगर जहांगीर यांनी सरकारी टेलिव्हिजनला सांगितले की, हे दोन्ही न्यायाधीश हेरगिरी आणि दहशतवादासह राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणे हाताळत होते. गेल्या वर्षी, या दोन्ही न्यायाधीशांनी हेरगिरी आणि दहशतवादी गट ओळखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत, ज्यामुळे दहशतवाद्यांमध्ये संताप निर्माण झाला. (हेही वाचा -Iran Woman Strips Protest: इराणमधील विद्यापीठात विद्यार्थिनीने काढले कपडे; काय आहे संपूर्ण प्रकरण?)

1998 मध्ये रझिनी यांच्या हत्येचा प्रयत्न -

दरम्यान, 1998 मध्ये रझिनी यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, तो प्रयत्न अयशस्वी झाला. दोन्ही न्यायाधीश कार्यकर्त्यांवर खटले चालवण्यासाठी आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रसिद्ध होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now