Indian Students Dies In America: अमेरिकेतील ॲरिझोना येथे कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
पेओरिया पोलिसांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटवली असून दोन्ही विद्यार्थी 19 वर्षांचे होते. मुक्का निवेश आणि गौथम पारसी असं या दोन मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
Indian Students Dies In America: अमेरिकेतील (America) ॲरिझोना (Arizona) येथे भरधाव वाहनाने कारला धडक दिल्याने दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू (Indian Students Die) झाला. ऍरिझोनाच्या फिनिक्स शहरात ठार झालेले दोन्ही विद्यार्थी तेलंगणातील होते. पेओरिया पोलिसांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटवली असून दोन्ही विद्यार्थी 19 वर्षांचे होते. मुक्का निवेश आणि गौथम पारसी असं या दोन मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कारमधील तिसरा प्रवासी आणि चालक या अपघातात जखमी झाले. परंतु, त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ॲरिझोना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन वाहनांची टक्कर झाली. पांढऱ्या रंगाची 2024 Kia फोर्ट आणि लाल रंगाची 2022 फोर्ड F150 ने एकमेकांना धडक दिली. (Indian Student Shot Dead In Canada: कॅनडामध्ये 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कारमध्ये गोळ्या झाडून हत्या)
प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की लाल F150 चा ड्रायव्हर कॅसल हॉट स्प्रिंग्स रोडवरून दक्षिणेकडे प्रवास करत होता तर पांढऱ्या रंगाच्या Kia फोर्टमधील चालक उत्तरेकडे जात होता. या अपघातामागील कारण तपासले जात आहे, असं ॲरिझोना पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा -Indian Missing Student Found Dead In Us: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गेल्या महिन्यात बेपत्ता झालेल्या मोहम्मद अब्दुल अराफातचा मृतदेह सापडला)
निवेश हा करीमनगर जिल्ह्यातील हुजुराबाद शहरातील रहिवाशी होता. तर गौतम हा जनगाव जिल्ह्यातील घाणपूर स्टेशन येथील रहिवाशी होता. दोघेही ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते.