Sanjay Raut यांनी Kirit Somaiyya च्या कुटुंबावर केले वक्तव्य, पाहा काय म्हणाले

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील शाब्दिक वाद सुरूच आहे. संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांना मुलुंडचा दलाल म्हटले आहे.मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, ईडीच्या धाडी पडणार, असे राऊत म्हणाले आहेत. किरीट सोमय्यांनी "ते 19 बंगले दाखवावं नाही तर शिवसैनिक जोड्यानं मारतील" असा इशारा दिला आहे.

पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांने भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असे खासदार संजय राऊत म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement