Year Ender 2020: भारतीय बाजारात 2020 वर्षात धुमाकूळ घातलेले 'हे' होते सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स

जाणूनघ घेऊयात ते कोणते होते ते 'Top 5 Smartphones'

Top 5 Smartphones in 2020 (Photo Credits: Twitter)

2020 हे वर्ष कोरोना व्हायरस, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, बिहार विधानसभा निवडणूक यामुळे अधिक गाजले. दरम्यान हे गंभीर विषय वगळता टेक्नोलॉजीच्या (Technology) दुनियेत अनेक बदल झाले. त्यात अनेक स्मार्टफोन्स (Smartphones), आयफोन्स (iphones)आले. ज्यांनी भारतीतय बाजारात अक्षरश: धुमाकूळ घातला. यात लॉकडाऊनच्या काळात दुकानं जरी बंद असली तरी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल्सची प्रचंड विक्री झाली. यात काही स्मार्टफोन्सनी भारतीय बाजारात अनेकांचे लक्ष वेधून घेतले. जाणूनघ घेऊयात ते कोणते होते ते 'Top 5 Smartphones'

1. Xiaomi Mi Note 10

या स्मार्टफोनमध्ये 6.47 इंचाची डिस्प्ले देण्यात आली असून यात जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. यात 108MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5260mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Xiaomi Mi Note 10 (Photo Credits: Twitter)

2. Samsung Galaxy S20

सॅमसंग गॅलेक्सी एस20 मध्ये ही जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत. यात 120Hz स्क्रिन देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्हाला गेमिंगदरम्यान जबरदसत् अनुभव मिळेल.हेदेखील वाचा- Nokia घेऊन येणार स्वस्त Android Go स्मार्टफोन, 15 डिसेंबरला होणार लॉन्च

Samsung Galaxy S20 (Photo Credits: Twitter)

3. OnePlus 8 Pro

वन प्लस 8 प्रो मध्ये 6. 78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, वन प्लस 8 मध्ये 6.55 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच वन प्लस 8 प्रो मध्ये 4 हजार 510 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर वन प्लस 8 मध्ये 4 हजार 300 एमएएच बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.

OnePlus 8 Pro (Photo Credits: Twiiter)

4. iPhone 12 Pro Max

iPhone 12 Pro Max च्या 128GB मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आणि 256GB मॉडेलची किंमत 1,39,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 512GB स्टोरेज मॉडेलमध्ये सुद्धा उपलब्ध करुन दिला जाणार असून त्याची किंमत 1,59,900 रुपये ठेवण्यात आली आहे.

iPhone 12 Pro Max (Photo Credits: Twitter)

5. Oppo Find X2 Pro

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर 60xZoom इतका मोठा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोजचा जबरदस्त अनुभव मिळेल.

Oppo Find X2 Pro (Photo Credits: Twitter)

तर हे होते 2020 मधील सर्वोत्कृष्ट टॉप 5 स्मार्टफोन्स. जे आपल्या आकर्षक आणि अफलातून वैशिष्ट्यांमुळे अनेकांची मनं जिंकली. येणा-या नवीन वर्षात सुद्धा असेच नवीन आणि धमाकेदार फोन्स येण्याच्या तयारीत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif