Year Ender 2019: पाहा कोणते आहेत या वर्षीचे Top 5 मोबाईल गेम्स
विशेष म्हणजे 'सबवे सर्फर्स' हा या दशकातील सर्वात डाउनलोड केलेला गेम बनला आहे. चला तर पाहूया या वर्षीचे टॉप 5 मोबाईल गेम्सची यादी.
Top 5 Mobile Games: मोबाईल गेमिंगसाठी 2019 हे वर्ष खूपच खास ठरलं कारण 'फ्री फायर' आणि 'कॉल ऑफ ड्यूटीः मोबाईल' यासारख्या गेम्सनी मोबाईल गेमिंगचं विश्वच बदललं आहे. मोबाईल मार्केट डेटा आणि अॅनालिटिक्स फर्म अॅप अॅनीच्या मते 'फ्री फायर' हा 2019 चा सर्वाधिक डाउनलोड केलेला गेम होता. 2019 च्या सर्वात जास्त डाउनलोड केलेल्या खेळांमध्ये 'फन रेस 3 डी', तसेच 'सबवे सर्फर्स' चा समावेश आहे. विशेष म्हणजे 'सबवे सर्फर्स' हा या दशकातील सर्वात डाउनलोड केलेला गेम बनला आहे. चला तर पाहूया या वर्षीचे टॉप 5 मोबाईल गेम्सची यादी.
PUBG Mobile
पबजी हा मोबाईल गेम 'अॅरेना ऑफ शौर्य' या गेमला मागे टाकत जगातील सर्वाधिक कमाई करणारा स्मार्टफोन गेम बनला आहे. सेन्सर टॉवरच्या ताज्या आकडेवारीनुसार पबजी मोबाईल व्हर्जनच्या उत्पन्नात वर्षाखेरीस 652 टक्के वाढ झाली असून या कालावधीत 496 दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली आहे.
Free Fire
फ्री फायर हा मोबाइलवर उपलब्ध असलेला एक अल्टिमेट सर्वायवल शूटर गेम आहे. प्रत्येक 10-मिनिटांचा गेम आपल्याला दुर्गम बेटावर नेऊन ठेवतो जिथे आपल्याला 49 इतर खेळाडूंविरूद्ध उभे केले जाते. खेळाडू मुक्तपणे त्यांच्या पॅराशूटसह त्यांचे स्टार्ट पॉईंट निवडतात आणि जितका वेळ राहता येईल तोपर्यंत सुरक्षित झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात.
Subway Surfers
जगभरात 2.7 अब्जापेक्षा जास्त डाउनलोडचा आकडा असणाऱ्या सबवे सर्फर्स या गेमला अॅप अॅनीने दशकातील सर्वाधिक डाउनलोड केलेला मोबाइल गेम म्हणून जाहीर केले आहे. सबवे सर्फर हा कधीही न थांबणाऱ्या एका धावपटूचा मोबाईल गेम आहे जो डेन्मार्कमधील खाजगी कंपन्या किलू आणि एसवायबी गेम्सने सह-विकसित केला आहे. सबवे सर्फर्समध्ये खेळाडू सुरक्षारक्षकापासून सुटतात, नाणी गोळा करतात आणि अडथळे पार करतात.
Color Bump 3D
रेट्रो ग्राफिक्स आणि आकर्षित रंगांचा हा एक आर्केड गेम आहे. हा गेम डिसेंबर 2018 मध्ये अँड्रॉइडवर आणि जानेवारी 2019 मध्ये आयओएस तसेच वेबजीएल या प्लॅटफॉर्म्सवर रिलीज झाला होता. या गेममध्ये खेळाडूला बॉलवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते आणि बॉलसारखे समान रंग नसलेल्या कोणत्याही वस्तूवर आपटणे टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्रेगागेम्स डॉट कॉमच्या मते, याचा वेग हळू हळू वाढतो परंतु जसजसे आपण प्रगती करता तशी त्याची गती जलद होत जाते.
Year Ender 2019: या वर्षात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले Top 5 'Dating Apps'
Fun Race 3D
फन रेस 3 डी हा एक प्रसिद्ध एपीके (अँड्रॉइड पॅकेज) खेळ आहे. या गेममध्ये एक खेळाडू आपल्या विरुद्ध स्पर्धकासह आव्हानात्मक ट्रॅकवर प्रतिस्पर्धा करतो. प्रत्येक स्तर एक नवीन अनोखा अनुभव देतो आणि तो खेळणे सोपे आहे. इतरांसह रेस करा, स्तर साध्य करा आणि नवीन लेवल अनलॉक करा.