Xiaomi चा नवा स्मार्टफोन Redmi Note 9T 5G ची लाँचिंग डेट आली समोर, 'ही' असू शकतात या मोबाईलची खास वैशिष्ट्ये

Redmi Note 9T 5G हा स्मार्टफोन 8 जानेवारीला GMT 20:00 (भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजता) लाँच होईल.

Redmi Note 9T 5G (Photo Credits: Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनी लवकरच आपला जबरदस्त स्मार्टफोन भारतात आणण्याच्या तयारीत आहे. Redmi Note 9T 5G हे या स्मार्टफोनचे नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा होती. मात्र आता या स्मार्टफोनची लाँचिंग तारीख समोर आली आहे. येत्या 8 जानेवराली हा स्मार्टफोन लाँच होणार असून Xiaomi कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवरुन याबाबत माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन मागील महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 9 Pro 5G चा ग्लोबल वेरियंट असेल. Redmi Note 9T 5G हा स्मार्टफोन 8 जानेवारीला GMT 20:00 (भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजता) लाँच होईल.

हा स्मार्टफोन व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. हा लाईव्ह इव्हेंट शाओमीच्या अधिकृत सोशल मिडिया चॅनल्सवर पाहता येईल. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो असे बोलले जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 25,000 च्या आसपास असेल. याबाबत तशी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.हेदेखील वाचा- Redmi 9 Prime वर दिली जातेय दमदार सूट, जाणून घ्या नव्या किंमतीसह स्पेसिफिकेशन

Redmi Note 9T 5G च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 6.53 इंचाची LCD डिस्प्ले असू शकते. त्याचबरोबर गीकबेंचवर लिस्टिंग केलेल्यामध्ये MediaTekDimensity 800U 5G SoC सह येऊ शकतो. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 10 वर आधारित असून MIUI 12 सह येऊ शकतो.

Redmi Note 9T 5G च्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि एक डेप्थ वा मायक्रो सेंसर सुद्धा दिला जाऊ शकतो. तसेच 20MP चा फ्रंट कॅमेरा सुद्धा असू शकतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून 22.5W फास्ट चार्जिंग फीचरसह देण्यात आला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान शाओमीने आपल्या चाहत्यांना एक मोठाच धक्का दिला आहे. शाओमी आपल्या आगामी स्मार्टफोनमध्ये 108MP चा कॅमेरा देणार आहे. Xiaomi Mi 10i 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून हा स्मार्टफोन येत्या 5 जानेवारीला भारतात लाँच होईल. या स्मार्टफोनच्या कॅमे-याचे जबरदस्त फिचर ऐकून सर्वांचे डोळे चक्रावले आहेत. त्याचबरोबर हा 5G फोन असल्याने चाहते देखील प्रचंड खूश आहेत.