Xiaomi Redmi 6A चा आजपासून सेल ; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Redmi 6A चा पहिला सेल आज 12 वाजल्यापासून अॅमेझॉन आणि शाओमीच्या ऑफिशिअल स्टोरवर सुरु झाला आहे.

रेडमी 6A (Photo Credit : MI Official Website )

शाओमीने अलिकडेच तीन बजेट स्मार्टफोन्स रेडमी 6, रेडमी 6A आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले आहेत. भारतीय युजर्सची मागणी लक्षात घेऊन हे फोन्स लॉन्च करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनच्या मागच्या सिरीजमध्ये रेडमी 5 लोकांच्या पसंतीस उतरला होता. या स्मार्टफोन्समध्ये Redmi 6A चा पहिला सेल आज 12 वाजल्यापासून अॅमेझॉन आणि शाओमीच्या ऑफिशिअल स्टोरवर सुरु झाला आहे. तर जाणून घेऊया या फोनबद्दल...

Redmi 6A ची किंमत

Redmi 6A चे 16 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंटची भारतात किंमत 5,999 रुपये आहे. तर 32 जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे. हे दोन्ही वेरिएंटचा सेल सुरु होत आहे. या दोन्ही स्मार्टफोनची ही किंमत फक्त दोन महिन्यांसाठी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर याच्या किंमतीत वाढ होईल.

स्मार्टफोनचे फिचर्स

- 5.45 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले

- डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720x1440 इतके आहे.

- फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि स्टोरेजचे दोन ऑप्शन्स आहेत- 16 जीबी आणि 32 जीबी.

- फोनचा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबीपर्यंत वाढवता येईल.

- ड्युल सिम कार्डला हा फोन सपोर्ट करतो.

- फोनमध्ये मीडियाटेक हेलियो ए22 प्रोसेसर देण्यात आले आहे.

- हा फोन अॅनरॉईड ओरिओ 8.1 वर आधारित MIUI 9.6 यूजर इंटरफेसवर काम करतो.

- 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर कॅमेऱ्याचे अपर्चर f/2.2 आहे.

- सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे.

- फोन 4G VoLTE नेटवर्कला सपोर्ट करतो.

- यात 3000 एमएएचची बॅटरी आहे.

- हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्लू ह्यू कलरमध्ये उपलब्ध आहे.