Xiaomi चा 108MP चा कॅमेरा असलेला Mi 10i 5G स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, काय असू शकते किंमत?
Xiaomi Mi 10i 5G स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 750G SoC सह लाँच केला आहे. यात ब्रांड न्यू 108MP चा कॅमेरा सेंसर मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोन 6.67 इंचाची IPS LCD डिस्प्ले असू शकते. याचे डिस्प्ले रिजोल्यूशन HDR10 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून नेहमी आपल्या भारतीय ग्राहकांसाठी काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. मात्र आता तर शाओमीने आपल्या चाहत्यांना एक मोठाच धक्का दिला आहे. शाओमी आपल्या आगामी स्मार्टफोनमध्ये 108MP चा कॅमेरा देणार आहे. Xiaomi Mi 10i 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून हा स्मार्टफोन येत्या 5 जानेवारीला भारतात लाँच होईल. या स्मार्टफोनच्या कॅमे-याचे जबरदस्त फिचर ऐकून सर्वांचे डोळे चक्रावले आहेत. त्याचबरोबर हा 5G फोन असल्याने चाहते देखील प्रचंड खूश आहेत.
Xiaomi Mi 10i 5G स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 750G SoC सह लाँच केला आहे. यात ब्रांड न्यू 108MP चा कॅमेरा सेंसर मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोन 6.67 इंचाची IPS LCD डिस्प्ले असू शकते. याचे डिस्प्ले रिजोल्यूशन HDR10 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे.
या स्मार्टफोनची भारतात किंमत 25,000 च्या आसपास असू शकते. भारतीय बाजारात हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 33W वायर्ड फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.हेदेखील वाचा- How To Make Group Call on Telegram: टेलिग्राम अॅपवर वर ग्रुप व्हिडिओ कॉल कसा कराल?
मनु कुमार जैन यांनी Mi 10i ला टीज करून सांगितले की Mi 10i च्या ‘i’ चा अर्थ इंडिया आहे. शाओमीच्या इंडिया टीमने भारतीय बाजारातील ट्रेंडला समोर ठेवून याचे डिझाईन बनवले आहे. या स्मार्टफोनला घेऊन भारतीय बाजारात बरीच चर्चा आहे. सर्वच चाहते या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत आहे.
कंपनीने शाओमीच्या या स्मार्टफोन बद्दल अद्याप फिचर्स, कलर आणि किंमती बद्दल कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र लिंक्सच्या माध्यमातून याचे स्टोरेज आणि कलर वेरियंटचा खुलासा झाला आहे. लिक्स्टर इंद्रानी चक्रब्रती यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये माहिती दिली होती की, Mi10 भारतात दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध होणारआहे. या वेरियंटमध्ये 6G रॅमसह 128GB स्टोरेज दिला जाणार आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळणार आहे. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामध्ये मिडनाइट ब्लॅक, पॅसिफिक सनराईज आमि एटलांटिक ब्लू रंगात मिळू शकतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)